नेरपिंगळाई येथिल केंद्र शाळेत उपान्त्य क्रिडा महोत्सव संपन्न

 



 नेरपिंगळाई  : नेरपिंगळाई येथिल जि प केंद्र शाळेत उपान्त्य क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन थाटात पार पडले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संजय मंगळे माजी सभापती होते तर उद्घाटक म्हणून गावाच्या सरपंच्या सविताताई खोडस्कर होत्या . प्रमुख उपस्थिती मध्ये  सोनाली नवले माजी उपसभापती , उजगावकर शिक्षण विस्तार अधिकारी, प्रविण पाचघरे अध्यक्ष शा व्य समिती नेर (मुले ) बाळासाहेब खाजबागे अध्यक्ष शा . व्य समिती नेर (कन्या) हीना कौसर अध्यक्षा नेर ( उर्दू) अजीम सर पात्र मुख्या नेर (उर्दू) इत्यादी उपस्थित होते.



 यावेळी अनेक प्रतिष्ठीत नागरीक हजर होते . क्रिडामहोस्तवात नेरपिंगळाई , शिरखेड , पिंपळखुटा केंद्रातील प्राथ तथा माध्यमिक गटातील चमू उपस्थित झाले होते क्रिडा मोहोत्सवाचे यशस्वी आयोजन मोहन निघोट केंद्र प्र नेर , संजय धांडे कें प्र पिंपळखुटा राजीक हुसेन कें प्र . शिरखेड तसेच नेर केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय खंडारकर यांनी केले होते .



 यावेळी जिप शाळा नेर ,पार्डी ,कवठाळ , नेर कन्या या शाळांची उत्कृष्ठ निदर्शने झाली . या कार्यक्रमाचे संचालन सुनिल डेहणकर यांनी केले तथा आभार स्मिता शेकोकार यांनी मानले .

Post a Comment

Previous Post Next Post