नेरपिंगळाई येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी

 



 प्रतिनिधी ,प्रमोद घाटे

   नेरपिंगळाई:  विद्येची आराध्य दैवत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती नेरपिंगळाई येथे मुख्य चौकात गुलाबपुरी महाराज मंदिर जवळ मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिरखेड पोलिस स्टेशनचे ठाणेदार सचिनजी लुले  उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विनोद भोजने  यांनी त्याग मूर्ती सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेचे पूजन केले, व कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.पुण्यवर्धन राऊत यांनी केले, त्यानंतर सावित्रीबाई फुले यांचा जीवनचरित्रावर डॉ. चंद्रकांत देशमुख यांनी विचार मांडले, तसेच प्रशांत पोहकर , सोनाली नवले, अबांदास  राऊत, पोलिस पाटील राजेश राऊत यांनी सुद्धा सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर विचार मांडले , तसेच मालगेताई यांनी सावित्रीबाई फुले वर कविता मांडली या कार्यक्रमाचे संचालन सागर माहोरे यांनी केले व आभार प्रदर्शन मा.सौ.सुनंदाताई तांदळे यांनी केले... या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता कैलाश कनेर, विनोद खंडारकर, सतीश पोटे, प्रदीप तायवाडे, सागर माहोरे, राहुल मंगळे, प्रकाश आजणकर रुपेश बाखडे कार्यक्रमाला उपस्थित विजयजी कपिले, नीलेशजी टेकाडे, निलेश भोजने, निलेश मंगळे व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post