जिल्हा प्रतिनिधी / पवन पाटणकर
अमरावती : शिराळा येथील अंगणवाडी मध्ये स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, शिक्षण तज्ञ, समाज सुधारक, कवियत्री, तसेच भारतातील पहिल्या महिला शिक्षिका यांची जयंती पर्यवेक्षिका आरती चिकटे मॅडम यांच्या मार्गदर्शनात शिराळा येथील अंगणवाडी केंद्र क्र. 517, 521, 522 मध्ये आम्ही सावित्रीच्या लेकी उपक्रम राबवून अंगणवाडी मधील चिमुकल्यांसोबत साजरी करण्यात आली.
अंगणवाडी मधील लहान विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले यांचा पेहराव करून देण्यात आला. व सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. व फोटोची पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांमध्ये अंगणवाडी सेविका सुशीला पु. भस्मे, सुनिता चिंचखेडे, लीना अ. अलोणे, तसेच अंगणवाडी मदतनीस मध्ये रेखा तिहिले, शुभांगी जवंजाळ, शितल पुनसे उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे महिला व पालक वर्गामध्ये ममता लांमसे, कीर्ती जवंजाळ, काजल लामसे, योगिता पटले, गौरी पटले, आरती काळमेघ, जयश्री लामसे, साधना पाटणकर, प्रियंका भस्मे, दर्शना येरणे, वृषाली भस्मे, लता भस्मे, कोमल शेंडे, रेश्मा भागवत, अजय पुंजेकर तसेच पत्रकार तथा युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे अमरावती उपजिल्हाप्रमुख पवन पाटणकर या कार्यक्रमाला उपस्थित होते.