अकोट : श्री नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुलसी कम्प्युटर्स अकोलखेड व अकोट पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रम घेण्यात आला..
🎯 लोक कॅम्पुटर लॅपटॉप मोबाईल यांचा खूप प्रमाणात वापर करीत आहेत. सोबतच सायबर गुन्हेगारी ही खूप वेगाने वाढत आहे.
💥याचे कारण सायबर सुरक्षेच्या बाबतीत आवश्यक असणाऱ्या माहितीचा अभाव यामुळे सर्रास लोक साबर गुन्हेगारीला बळी पडतात.
💥अल्पवयीन मूल्य मुली व विद्यार्थी ऑनलाइन गेम खेळणे मित्र बनविणे नेटवर्किंग साईटचा उपयोग खूप जास्त प्रमाणात करतात. ऑनलाइन गेम शॉपिंग करणे इंटरनेट फायद्या शिवाय सायबर गुन्हेगारी खूप जलद गतीने वाढ झाली आहे. यांना सहजपणे आपल्या जाळ्यात ओढतात. सायबर गुन्ह्यापासून कसा बचाव करता येईल व कशाप्रकारे जागरूक रहावे यासंबंधी मार्गदर्शन केले.
💥भारत इंटरनेट वापरात दुसऱ्या क्रमांकावर आहे त्याचप्रमाणे सायबर गुन्ह्यांमध्ये खूप प्रमाणात वाढ झालेली सुद्धा आहे केवळ भारताचाच नव्हे तर सर्व जगापुढे सायबर सुरक्षिततेचे आव्हान उभे झाले आहे. सायबर गुन्हेगार कशाप्रकारे आम्हीच टाकून बळी पाडतात व आपल्या जाळ्यात अडकवितात त्यापासून स्वतःचा कशाप्रकारे बचाव करावा.
सर्वांनी सायबर गुन्ह्यांपासून जागरूक राहण्याची खूप गरज आहे. राहुल टाले सरांनी सांगितले.तसेच श्री नेहरू विद्यालय व कनिष्ठ विद्यालय तळोकार सर मुख्याध्यापक यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सायबर धोके काय आहेत हे समजावून सांगितले. तसेच मोबाईलचा अति जास्त प्रमाणात वापर केल्याने त्याचे कोणते दुष्परिणाम होऊ शकतात कोणते आजार होऊ शकतात हे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष-अरुण तळोकार श्री नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात अकोलखेड चे मुख्याध्यापक
यावेळी प्रमुख उपस्थिती किशोर जुनघरे ( आकोट ग्रामीण पोलीस ठाणेदार ),गौतम तेलगोटे पीएसआय ,(आकोट ग्रामीण ), तसेच मार्गदर्शक व्याख्याते राहुल टाले -मार्केटिंग एक्झिक्यूटिव्ह महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित पुणे ),प्रियंका पांडे - एमकेसीएल मार्केटिंग एंटरन ,वैभव चोपडे- मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह एमकेसीएल, प्रियंका केदार - अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ विदर्भ कार्याध्यक्ष विदर्भ संघटक , अश्विन पितांबर वाले - पोलीस बॉईज असोसिएशन विदर्भ अध्यक्ष, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ उपाध्यक्ष अकोट शहर , पवन बेलसरे - सिटी न्यूज पत्रकार, तसेच कार्यक्रमाला श्री नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अकोलखेड चे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सर्व प्राध्यापक वर्ग व तुलसी कम्प्युटर्सचे सर्व सहकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.