प्रतिनिधी/प्रमोद घाटे : मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथील अमन इंग्लिश स्कूल मध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी अमन चाॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने ऊर्दू शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा हिना कौसर अंसार कुरेशी यांचा सत्कार करण्यात आला स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, देशभक्ती गित कार्यक्रमा च्या माध्यमातून उपस्थितांचे मने जिंकली कार्यक्रमाला अमन चाॅरिटेबल ट्रस्ट चे पदाधिकारी साजिद पठाण,अंसार कुरेशी,जहिर खान कासिम खान, इकबाल खान,जिया मिर्झा शेख,जफर हाजी मुर्तुजा, अब्दुल रज्जाक, साजिद शाह,फहिम पठाण, मंजूर खान ह नुमान खान सदर कार्यक्रमास उपस्थित होते.