दुचाकी व मोबाईल घेऊन पसार झालेला आरोपी मुद्देमालसह पोलिसांच्या अटकेत
मुर्तिजापूर बायपास हॉटेल वरील प्रकार
मुर्तिजापूर - शहरालगत कारंजा बायपासवर असलेल्या हॉटेल मध्ये फिर्यादी हा नाष्टा चहा घेत असता ४२ वर्षीय व्यक्तीजवळून रोख घेतलेली रक्कम परत न केल्यामुळे सदर व्यक्तीने फिर्यादी यांची दुचाकी व मोबाईल घेवून पसार झाल्याची घटना २५ आक्टोंबर २०२४ रोजी घडल्याची फिर्याद २९ जानेवारी रोजी शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली .
सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून शहर पोलीसांनी तपास सुरू केला असता आरोपी पसार झाला पसार आरोपीस तीन महिन्यानंतर बुधवारी मुद्देमालासह शिताफीने अटक करून गजाआड करण्यात आले .
फिर्यादी सागर अरूण राजूरकर वय ४३ रा.संतोष नगर जुनीवस्ती मुर्तिजापूर यांनी तक्रार दिल्याप्रमाणे तो पुणे येथे खाजगी नोकरी करीत असून आरोपी विजय लंबाडे वय ४२ रा. पारडी , तालुका मंगरूळपीर जिल्हा वाशिम याने फिर्यादी यास हरॉसीमध्ये जुना ट्रॅक्टर घेण्याकरिता ५० हजार रुपये दिले असता सदर रक्कम फिर्यादी याने रक्कम हरार्सी करीता संबधीत कार्यालयात जमा केली असता हारासीची बोली जास्त झाल्याने सदर रक्कम तीन चार महिन्यानंतर मिळत असल्याने आरोपी यास रक्कम न दिल्याने त्यानें रक्कम साठी तगादा लावीत असल्याने त्यास १० हजार रुपये परत केले उर्वरित रक्कम सदर कार्यालयातून मिळाल्या नंतर देतो असे सांगितले मात्र २५ आक्टोंबर २०२४ रोजी फिर्यादी हा कारंजा बायपास वरील हॉटेल मध्ये दुचाकी क्र एम एच ३० ए एस ६४४४ हे वाहन बाहेर ऊभी करून नाष्टा चहा घेत असता अरोपी हा तेथे येवून रकमेचा तगादा लावीत असता फिर्यादी हा आपल्या दुचाकीची चाबी व मोबाईल टेबल वर ठेवून नाष्टा करीत असता बाथरूम मध्ये गेला ही संधी पाहून आरोपी विजय लंबाडे याने मोटरसायकल अंदाजे किंमत ७५ हजार व मोबाईल किंमत ३० हजार असे एकूण १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल घेवून पसार झाल्याच्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात आरोपी विजय लंबाडे याच्या विरुद्ध बिएनएस कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक नागोराव भांगे करीत असता शहर पोलिसांना मिळालेला गुप्त माहितीवरुन जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चनसिंग , अपर जिल्हा अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजित जाधव , अमंलदार सुरेश पांडे,पो का सचिन दांदळे , मंगेश विल्हेकर, सचिन दुबे, गजानन खेडकर यांनी पसार आरोपीस मुद्देमालासह शिताफीने गजाआड केले.