मुर्तिजापूर : येथील दिव्यांग सुधीर कडू यांना नुकताच २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर जिल्हा परिषद अकोला समाज कल्याण विभागाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा मानाचा पुरस्कार म्हणून प्रेरणा पुरस्कार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी यांच्या हस्ते सपत्नीक सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र व शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. जिल्हास्तरावर दिव्यांग व्यक्तींना प्रेरणा पुरस्कार साठी दरवर्षी निवड केल्या जाते ,दिव्यांग व्यक्ती अधिनियम २०१६ नुसार दिव्यांग कल्याण आयुक्त व समाजकल्याण दिव्यांग विभाग अकोला यांच्या समन्वयातून जाणीव जागृती कार्यक्रम व संवेदनशीलता विषयक कार्यक्रमाचे आयोजन करून दिव्यांग व्यक्तीच्या अधिकारात संरक्षण देण्याच्या तरतुदीनुसार पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, सुधीर कडू हे गेल्या अनेक वर्षांपासून राज्य उपाध्यक्ष संजय बरडे यांचे नेतृत्वाखाली दिव्यांग बांधवांसाठी अनेक उपक्रम राबवित असतात, तसेच शासनाच्या विविध उपक्रमात सहभाग घेऊन शासनास सर्वतोपरी मदत करतात लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये दिव्यांगाचे १०० टक्के मतदान होण्याच्या दृष्टीने जनजागृती व कोविड १९ मध्ये दिव्यांगांना मदत व सहकार्य व अनेक लोकोपयोगी कार्य करून दिव्यांगाच्या कल्याणासाठी दिव्यांग पुनर्वसनासाठी विविध कार्यक्रम घेऊन अनेक कार्यक्रम राबवितात.
अशा व्यक्तीचा सन्मान म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., तसेच समाज कल्याण अधिकारी हरिनारायण सिंह परिहार , विनय ठमके अति.मु.का.अ. सुनील बोंगिरवार वै.सा.का. यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषदेत सन्मान सोहळा आयोजित करून सुधीर कडू व त्यांच्या पत्नी शितल सुधीर कडू यांचा सपत्नीक सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. आपल्या या पुरस्काराबद्दल सुधीर कडू यांनी,दिव्यांग पुनर्वसन बहूउद्देशीय संस्था हातगाव,व महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना व दिव्यांग बेरोजगार संघटना राज्य उपाध्यक्ष .संजय बरडे,मो.अ.अजीज सचिव, .दिलिप सरदार व समस्त दिव्यांग बंधू भगिनी व तालुका व जिल्हा प्रशासन तसेच पत्रकार बांधव व मित्रपरिवार यांना आपल्या यशाचे श्रेय दिले आहे.