विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्याला वळसा घालून गेलेल्या पैनगंगा नदी पात्रावरील चोलेवाडी या गावाला लागून असलेल्या चोले पेंड या नदी पेंडाला लागून असलेल्या नदीपात्रात वाळू तस्करांनी वाळू चोरी करण्यासाठी नदीपात्रातील पाण्यात दोरीने बांधून ठेवलेले दोन तराफे तहसीलदारांनी पाण्यातून नदीपात्रावर आणून जागेवरच जाळून भस्म केल्याची घटना दिनांक 28 रोजी दुपारी दोन वाजता घडल्याने वाळू तस्करांच्या मनात तहसीलदारांच्या धडक कारवाईची धडकी भरली आहे
गेल्या आठवड्याभरापासून तहसीलदार किशोर यादव यांनी वाळू चोरीसाठी नदीपात्रातून बनविलेले रस्ते खोदण्याचे काम सुरू केले असून विदर्भातील वाळू तस्कर ही माहूर च्या हद्दीतून पैनगंगा नदी पात्रातून वाळू रात्रीला वाळू चोरी करत असल्याने महागाव आर्णि तहसील हद्दीतील असलेल्या पैनगंगा नदी पात्रावर तहसीलदार किशोर यादव यांनाच नजर ठेवावी लागत असल्याने रात्री कुठेही जावे लागत आहे त्यातच मराठवाडा विदर्भातील वाळू तस्कर तहसीलदारांच्या धडक् कारवाया मोठ्या प्रमाणात होत असल्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील वाळू तस्करांनी संगणमत करून रात्रीला तरफ्याद्वारे वाळू उपसणार असल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदारांनी अनेक ठिकाणी लपवून ठेवलेले तराफे जाळले असून नदीपत्रात दोरी च्या साह्याने बांधून नदीच्या वळणावर पाण्यात लपून ठेवलेले तराफे नदीपात्रातील पाण्यात उतरून बाहेर काढत ते जाळून भस्म करत असल्याने वाळू तस्कर बिळात लपून बसले की काय असा भास होत आहे.
अनेक ठिकाणी वाळू तस्करांनी तराफे लपवून ठेवलेले असल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदार किशोर यादव यांनी तलाठी एस डी गावंडे महसूल सेवक दीपक लोखंडे वाहन चालक विलास शेडमाके यांचे सह ही तराफे जाळण्याची भस्मासुरी कारवाही केल्याने विदर्भातील गोळीबार करणारे डॉन बिळात लपले असून तहसीलदारांच्या वेळप्रसंगी गोळी घालण्याचा इशाऱ्यामुळे वाळू तस्करी सध्या तरी बंद दिसत आहे.