महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

  






     मूर्तिजापूर - महाविद्यालयातून घरी परत जाणाऱ्या युवतीचा विनयभंग करून मारण करणाऱ्या व जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या युवकाविरुद्ध येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

     सदर महाविद्यालयीन युवती काल रात्री दुचाकीने महाविद्यालयातून घरी परत जात असतांना तिच्या मागून स्कूटीने येऊन तिची दुचाकी थांबवून खरब (ढोरे) च्या जय पुरूषोत्तम थोप (वय २२ वर्षे) याने सदर युवतीची दुचाकी थांबवुन वाईट उद्देशाने तिचा हात पकडुन 'मी तुझावर प्रेम करतो', असे म्हणाला. सदर युवतीने त्याला नकार दिल्याने त्याने तिला गालावर व कानावर जोरदार झापड मारुन जिवे मारण्याची धमकी दिली. अशा फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या ७४, ७८(२), ११५(२), ३५१(२) कलमांतर्गत येथील शहर पोलीसांनी आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला. ठाणेदर अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय पवार पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post