जनजागृती सेवा संस्थेतर्फे ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव

 




मुंबई(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)आपल्या सामाजिक कार्याने बदलापूर येथील जनजागृती सेवा संस्थेने आपली कार्याची छाप सर्वदूर पसरविली आहे.विविध क्षेत्रात सामाजिक बांधिलकी म्हणून संस्था कार्यरत आहे.त्याच अनुषंगाने पत्रकार दिनाचे औचित्य साधून जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी नुकताच जेष्ठ पत्रकारांचा मुंबई मराठी पत्रकार संघात जाऊन गौरव केला.संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष संदीप चव्हाण,उपाध्यक्षा स्वाती घोसाळकर आणि कार्यकारिणी सदस्य आत्माराम नाटेकर यांना गौरवपत्र देऊन त्यांच्या त्यांच्या पत्रकारितेतील कार्याबद्दल यथोचित सन्मान केला.जनजागृती सेवा संस्थेच्या या गौरवाबद्दल सत्कारमुर्तींनी कृतज्ञता व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post