अनोळखी इसमाचा रेल्वेतुन पडून मृत्यू ; माना ते मंदूरा शिवारातील घटना

 




मूर्तिजापूर - तालुक्यातील माना ते मंदुरा रेल्वे लाईनवर ४२ वर्षीय अनोळखी इसमाचा पडून मृत्यू झाल्याची घटना २१जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान समोर आली आहे .

याप्रकरणी माना रेल्वे स्टेशनचे मास्तर कमलेश चाचरे यांच्यातर्फे नितीन वाघमारे वय ३१ व्यवसाय ट्रकमॅन रेल्वे स्टेशन माना यांनी पोलिसांना माहिती दिली की, रेल्वेलाईनवर माना ते मंदुरा शिवारात पोल क्र ६३७ /२६-२८

या घटनास्थळी एक ४२ वर्षीय अनोळखी इसम मृत्यू पडून दिसून आला . त्याच्या अंगात निळ्या रंगाचे फुल बाह्याचे शर्ट , निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट , उजव्या हातावर सुदर्शन असे गोंदलेले दिसून आले . रेल्वेतून पडल्याने त्याच्या डोळ्याला मागील बाजूस गंभीर दुःखापत होवून मृत्यू झाल्याबाबतची फिर्याद दिल्यावरून ठाणेदार सुरज सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश महाजन ,सहायक उपनिरीक्षक राजेंद्र वानखडे , पो का आकाश काळे हे घटनास्थळी पोहचून पंचनामा करून प्रेताचे शवविच्छेदनासाठी मूर्तिजापूरच्या लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले असून या प्रकरणी माना पोलीस स्टेशनला मर्ग दाखल करण्यात आला आहे .




Post a Comment

Previous Post Next Post