जिल्हा प्रतिनिधी - पवन पाटणकर
अमरावती : नेरपिंगळाई हा स्वतंत्र तालुका निर्माण करण्यात यावा या मागणीसाठी
युवाशक्ती ग्रामविकास संगठन महाराष्ट्र राज्य अमरावती जिल्हा पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून चर्चा करून मागणी केली.
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये अमरावती जिल्ह्यातील नेरपिंगळाई हे सर्वात मोठे गाव असुन तिवसा विधानसभा मतदार संघातील सर्वात जास्त लोकसंखेचे गाव आहे व आजूबाजूच्या गावाची मुख्य बाजारपेठ आहे. गावाची लोकसंख्या ईतर काही तालुक्यांच्या ठिकाणांच्या गावापेक्षा बरोबरीची किवा जास्त असुन भौगोलिक क्षेत्र मोठे आहे व उत्तरोत्तर लोकसंख्या व भौगोलिक क्षेत्रफळात वाढ होत आहे. तसेच नेरपिंगळाई येथे विद्यालय, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, बँक, सहकारी सोसायटी शासकीय गोदाम, कृषि केंद्रे, महाराष्ट्र विदुयत महामंडळ चे कार्यालय असून येथे परिसरातील लोकांची रेलचेल असते या सर्व शासकीय व निमशासकीय कामकाजासाठी नेरपिंगळाई हेच मुख्य केंद्र आहे.
त्यामुळे येथील नागरिकांची बरेच वर्षांपासून मोर्शी तालुक्यातील धामनगाव शिरखेड आणि नेरपिंगळाई अश्या ३ तीन महसूल मंडळ मधील जवळजवळ ६० ते ७० गाव व लागूनच असणारे अमरावती तालुक्यातील काही गावे मिळुन एक स्वतंत्र असा नेरपिंगळाई तालुका निर्माण केल्यास मोर्शी तहसील कार्यालयावरील भार कमी होवून दोन्ही तालुक्यातील कामे वेगाने होईल.नागरीकांच्या कामकाजांसाठी होणाऱ्या चकरा कमी होईल. या आधी सुध्दा या मागणीकरीता बरेचदा निवेदन देण्यात आले तत्कालीन मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांना सुध्दा निवेदन देण्यात आले.
त्यावर सकारात्मक चर्चा सुरू झाली तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटिल हे सुद्धा मागणिचा योग्य विचार करू असे त्यांनी सांगितले असतांना सरकार चा कार्यकाळ संपला आणि त्यावर दुर्लक्ष झाले.परंतु आता महायुतीचे सरकार आलेले असल्यामुळे आपणाकडून हे मागणी शासन दरबारी लाऊन नेरपिंगळाई सह आजुबाजुच्या गावातील नागरिकांना न्याय द्यावा व वरील मागणीचा विचार करून नागरीकांच्या सोयीसुविधेसाठी नेरपिंगळाई येथे तहसील कार्यालय स्थापन करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी युवाशक्ती ग्रामविकास संगठन चे संस्थापक अध्यक्ष इमरान पठाण, जिल्हाप्रमुख प्रमोद घाटे,उपजिल्हा प्रमुख पवन पाटणकर,स्वप्निल चव्हाण उपजिल्हा प्रमुख , देवेंद्र भोंडे जिल्हा सचिव, आकाश शेंडे जिल्हा सहसचिव, निलेश गजभिये सह कोषाध्यक्ष , तुषार खडके तालुका अध्यक्ष, सुधिर तायडे, सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..



