अमरावती - जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अडगाव ,खाडे ,शेत शिवार नबापूर, येथे आज सकाळी ११.३० वाजता दिनांक २२ जानेवारी रोजी चंद्रशेखर र्घीहे यांच्या थ्रेशर मशीन वर सकाळी निलेश शालीकराम हेंड या शेतकऱ्याच्या शेतात तुरीच्या पेंड्या ट्रॅक्टर वरील मळणी यंत्रात (हेडंबा थ्रेशर) मध्ये गावातील मंजुर अंकुश रंगराव सरदार ,वय ३२ वर्ष ,उमेश हेन्ड ,यांच्या शेतात हेडंबा कटर मशीन मध्ये त्याचा पाय घसरल्याने थ्रेशर मध्ये अडकल्याने त्याचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाला. त्यामध्ये अक्षरशा अंकुशच्या शरीराचे तुकडे ,तुकडे, झाल्याचे दिसून आले, त्यांच्या सोबत काम करत असणारे काही मजूर घायबरून गेले होते ,काहींना चक्कर येऊन तब्येत खालवचे दिसून आले आहे. तालुक्यात थ्रेशर मध्ये अटकण्याची ही सर्वात मोठी अपघाती दुर्घटना समजली जात आहे.
कुटुंबाचे नातेवाईक कमालीची धास्तावले असून अंकुश ला एक मुलगा अर्नव , एक मुलगी कु. आनंदी,असे दोन अपत्ये आहेत. ते पण लहान आहेत, दोन भाऊ मंजुरी करीता पुण्याला असल्याचे समजले, मृतकाचे वडील ,या पूर्वी मरण पावले असल्याचे सांगितले. घरातील कर्ता पुरुष अंकुश सरदार हाच होता परंतु त्याच्या दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे ,स्थानिक पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळाला भेट देऊन मृतदेह ताब्यात घेण्यात आला. घटनेची माहिती अंजनगाव सुर्जी तहसीलदार पुष्पा सोळंके दाभेराव यांना देण्यात आली.मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी सर्वसामान्य गावातील नागरिकांनी केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे थ्रेशर मालक व मजुरानी सतर्कता बाळगावी काम करताना सांभाळून काम करावे. व जीवित हानी होणार नाही इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी
असे सुद्धा या घटने वरून. नागरिकाच्या मध्ये चर्चा आहेत . मृतक अशुंक रंगराव सरदार यांचे शव अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले असून वृत्त लिहेस्तव शवविच्छेदन करण्यात आले नाही.अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय येथे स्थानिक आमदार गजानन लवटे, व रुग्ण सेवक अशोक मोरे यांनी भेट दिवून सांत्वन केले.