नेरपिंगळाई - मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथील जनता विद्यालयामध्ये आज शाळेच्या प्राचार्या सरला कुचे व पर्यवेक्षिका अनिता तायडे या वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या.यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ.पंजाबराव (उपाख्य) भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.प्रकाश राठी,प्रमुख अतिथी म्हणून माजी पर्यवेक्षक व्हि.के.राऊत होते.
यावेळी जेष्ठ शिक्षिका आर.बी.दिवान,नलिनी देशमुख,प्रा.विजय साटोटे ,सहशिक्षक सत्यजित देशमुख ,अनुराधा डवरे ,पी.व्ही. ठाकरे ,शिक्षक प्रतिनिधी राजेश सुखदेवे ,या सर्वांनी सरला कुचे व अनिता तायडे यांचा कार्यकाळ कधी सुरू झाला व त्यांनी या काळात केलेले कामे व आलेले अनुभव याविषयी सविस्तर अशी माहिती दिली.व मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी पालक सभेचे उपाध्यक्ष पुण्यवर्धन राऊत,सदस्या रमाताई इंगळे,सदस्य .कैलासराव कनेर, गावचे उपसरपंच मंगेश अडणे ग्रा.प.सदस्य अश्विन खुरपडे,सहशिक्षक पी.व्ही.ठाकरे ,बाळू कांबळे ,प्रा.शुभम भुतेकर ,अमर यावलीकर,प्रा.एस.ए.माहोरे,ए.एस.उईके ,सपना राऊत ,पुजा यावलीकर ,पी.एस.खवले, संकेत फरतोडे ,शिक्षकेत्तर कर्मचारी सागर इंगोले,राजेंद्र टेकाडे,शेकोकार बाबु,नरेंद्र गुल्हाने,निखिल यावले,कुचे परीवार व वानखडे परीवाराचे सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक आदी उपस्थित होते.याकार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.प्रिती क्षिरसागर यांनी केले.तर आभार प्रदर्शन सीमा सोनपराते यांनी केले.हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.