गाव सहेली टीम नेटवर्क
अमरावती,कु-हा : माझं गांव, माझा उत्सव, (कुऱ्हा महोत्सव )अंतर्गत आयोजित शालेय निबंध स्पर्धा आयोजीत केली होती.विविध गटात, वेगवेगळे विषय ठेवण्यात आले होते. खूप मोठ्या संख्येने विधर्थांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत विषय डॉ पंजाबराव देशमुख यांचे जीवन व कार्य हा होता.
या स्पर्धेमध्ये परीक्षण करून कु. स्वरा संजय कांबळे हिला प्रथम क्रमांक प्राप्त झाला, तीला बक्षीस मान्यवारांचे हस्ते ट्रॉफी देऊन तिचा सत्कार करण्यात आला. तेव्हा डॉ आखरे, विवेक बिंड, अमोल भागवत, नाना मानमोडे यांनी स्वरा चे अभिनंदन केले.