विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
किनवट : गोकुंदा येथील भारतीय स्टेट बँक चे एटीएम मशीन चोरट्यांनी फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्यांनी एटीएम मशीन फोडून अंदाजे तब्बल 21 लाख रुपये लंपास केले आहे. याप्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. अशी माहिती शाखा व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा गोकुंदा यांनी दिली.
शाखा व्यवस्थापक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब ठाकरे चौक गोकुंदा परिसरात नागरिक साखर झोपेत असताना रात्री 2 च्या सुमारास एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. चोरट्याने चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरे लाकडाने दुसऱ्या बाजूला फिरवून एटीएम मशीन फोडल्याचे निदर्शनास येत आहे. घटनेची माहिती मिळतात किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणे केली. बातमी लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.