आचार संहिता लागण्यापूर्वी भुमिपुजन केलेले काम सुरू करावे विनोद अंभोरे यांची जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी



गावाकडची बातमी कैलास  बनसोड 

विधानसभा निवडणूकिपुर्वी डोंगरकिन्ही एप्रिल वार्ड क्र 3 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाचे भुमीपुजन केले याचा विद्यमान आमदार अमित झनक यांना विसर पडला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आमदार यांना स्मरण पत्र देण्यात आले आहे. सा,बां, विभाग मालेगांव व्दारा प्राप्त माहिती नुसार सन 2023-2024 मध्ये स्थानिक विकास निधि मध्ये काम टाकण्यात आले होते. त्या नंतर दिनांक 1 फेब्रुवारी 2024 मंजुरी मिळाली आहे हे सभागृहाचे काम 1 फेब्रुवारी 2025 च्या आत पुर्ण व्हायला पाहिजे कारण शासनाच्या नियमानुसार हे काम मंजुर झाल्या नंतर एक वर्षाच्या आत पुर्ण व्हायला पाहिजे ,काम पुर्ण करण्याचा कार्यकाळ संपत आला ,तरी सुद्धा काम लटकुन ठेवण्यात आले,कारण इलेक्शन मध्ये फायदा व्हावा. त्यामुळे आदर्श आचार संहिता लागण्या पुर्वी भुमिपुजन करण्यात आले आणि लगेचच त्या ठिकाणी मजबुर असलेला डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराचा ओटा फोडुन टाकण्यात आला त्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांची मुर्ती आहे आणि त्या ठिकाणी तोड फोड़ केलेले विटा,माती,दगड,कचरा मुर्तीच्या चहुबाजुने पडलेला आहे.

 त्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला ना संविधान दिवस साजरा करता आला ना सहा डिसेंबर ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता आले नाही.

१ जानेवारी भिमाकोरेगांव शौर्यदिन ,असेल चौदा जानेवारी मराठवाड़ा विद्यापिठ नामविस्तार दिन सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी साजरे करता आले नाही जे आमच्या अस्तित्वाचे सन आहे आणि तेच आम्हाला साजरे करता आले नाही त्यामुळे आमच्या भावणा दुखावत आहेत या पुढिल सन सुद्धा आम्हाला साजरे करता एतिल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. चार महिने झाले भुमिपुजन करुण तरी काॅन्ट्याक्टर ने वळुन पाहिले नाही ना आमदाराने या कामाकडे वळून पाहिले त्यामुळे काॅन्ट्याक्टर व सम्बंधित अधिकारी यांच्या वर रितसर कार्यवाही करण्यात यावी अशाप्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी वाशिम यांना देण्यात आले आहे. आमदार यांना कामाचा विसर तर पडला नाही ना असा प्रश्न निर्माण झाला असल्याने जिल्हाधिकारी यांना निवेदाद्वारे केली आहे..




Post a Comment

Previous Post Next Post