गावाकडची बातमी •नेरपिंगळाई | सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आदर्श शिक्षिकेचा सत्कार


गाव सहेली- रूपाली पाचघरे, नेरपिंगळाई

नेरपिंगळाई :  येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे दिनांक 3 जानेवारी रोजी महिला भगिनींनी सावित्रीबाई फुले यांची जयंती संस्थेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरी केली. सावित्रीबाईच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.


         या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुमुद होले या होत्या तर प्रमुख पाहुणे रेखाताई भोजने, सोनाली नवले, इंदिरा कोकाटे मायाताई पाचघरे या होत्या. या कार्यक्रमाचे औचित साधून जिल्हा परिषद मुलांची शाळा नेरपिंगळाई येथील जिल्हा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त शिक्षिका कु. जयश्री रामदास शेकार यांचा सत्कार करण्यात आला.



   कार्यक्रमाचे संचालन मीनल भोजने यांनी तर प्रास्ताविक मंगला मंगळे यांनी केले.कार्यक्रमाला उपस्थित रूपाली पाचघरे, वैशाली कुरेकर, पल्लवी भोजने, कल्पना पंत ,मंगला माहुरे स्वप्ना बडासे ,नूतन भोजने ,कल्याणी देवघरे आदी उपस्थित होत्या. आभार प्रदर्शन प्रिया कोकाटे यांनी केले..

Post a Comment

Previous Post Next Post