राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या हस्ते डी. एम. एक्स. ग्रुप महाराष्ट्र राज्य कालदर्शिका 2025 चे प्रकाशन




 जिल्हा प्रतिनिधी : पवन पाटणकर

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्य डी.एम. एक्स. ग्रुप महाराष्ट्र राज्य कालदर्शिका 2025 चे प्रकाशन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या हस्ते अमरावती येथे तुषार भारतीय मित्रपरिवार " तपपूर्ती अमृतमधन व्याख्यानाला " या कार्यक्रमात करण्यात आले. 



या कार्यक्रमात ग्रुपचे संस्थापक ऋतिक मालपे यांनी भास्कर पेरे पाटील यांचा सत्कार शाल, श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो देऊन सत्कार केला. सोबतच  सभापती तुषार भारतीय व मित्रपरिवार यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

   याप्रसंगी डी.एम.एक्स. संस्थापक ऋतिक गो. मालपे, माजी सभापती तुषार भारतीय, प्रशांत शेगोकर, चेतन गावंडे, डी.एम.एक्स. अध्यक्ष ऋषिकेश सावरकर, उपाध्यक्ष ऋतिक गहूकर, शहराध्यक्ष भावेश मैदानकर, उपाध्यक्ष अमित वानखडे, मंदार नानोटी , ऋषी ठवकर, आदेश मैदानकर, राम शेगोकर, अखिलेश  भारतीय व डी.एम.एक्स ग्रुपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post