गावाकडची बातमी| गजानन बाबा मंदिरात 13 फेब्रुवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह

 



जिल्हा विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे 

किनवट - श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्या औचित्यावर किनवट येथिल गजानन महाराज मंदीरात १३ फेब्रुवारी पासून अखंड हरीनाम सप्ताह आणि संगीतमय देवी भागवत कथेला सुरुवात होणार आहे. २१ फेब्रुवारी रोजी महाकाल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे १३ रोजी पहिला अध्याय, १४ रोजी दहावा आणि १५ रोजी सतरावा अध्याय असे तीन दिवस्यीय सामुहिक पारायण होणार आहे. तसेच १८, १९ आणि २० रोजी श्रीदत्त महायाग यज्ञ सोहळा संपन्न होणार असून भाविक भक्तांनी अखंड हरीनाम सप्ताचा लाभ घेण्याचे संयोजकांनी आवाहन केले आहे.

      श्री गजानन महाराज संस्थान किनवटद्वारा श्री गजानन महाराज प्रगटदिन उत्सव सोहळ्याची ३३ वर्षापासूनची अखंडसेवा सुरु आहे. हजारो भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. सप्ताहाच्या पहिल्या दिवसाची कीर्तनसेवा ही ह.भ.प.विश्वनाथ महाराज देवकत्ते किनवटकर यांच्याकडे आहे. ह.भ.प.रघूनाथ महाराज कराड बोधडीकर यांच्याकडे दुसरा दिवस, तिसरा दिवस ह.भ.प.मारोती महाराज गित्ते इंद्रवेली (तेलंगणा), चौथा दिवसीची कीर्तनसेवा भीमाशंकर महाराज पुराणिक नागढव, पाचवा दिवस ह.भ.प.भाकडे महाराज मोर्शी (अमरावती), सहावा दिवस ह.भ.प.कालीदास जोशी महाराज लातूर, सातव्या दिवस्यी ह.भ.प.पुंडलिक महाराज खुर्मुटे (देवाची आळंदी), आठव्या दिवस्यी ह.भ.प.लोखंडे महाराज जालना आणि नवव्या दिवस्यी सकाळी ह.भ.प.नारायण महाराज महादापूरकर यांचे महाकाल्याचे कीर्तनसेवा होणार असून भजन, कीर्तन अशा विविध कार्यक्रमांनी सप्ताह साजरा होणार असल्याचे संयोजकांनी कळवले आहे..

Post a Comment

Previous Post Next Post