तुरखेड फाट्यानजीक रात्री साडे दहा वाजताची घटना
मूर्तिजापूर - ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तुरखेड फाट्यानजीक २६ जानेवारी रोजी रात्री साडे दहा वाजताच्या दरम्यान शेतात रखवालदार म्हणून गेलेल्या ३५ वर्षीय इसमाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो घटनास्थळी ठार झाल्याची घटना समोर आली आहे .
फिर्यादी अविनाश नागोराव सलामे वय २५ रा तुरखेड यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला लेखी बयाण दिले की, २६ जानेवारी रोजी रात्री तो ऋणमोचन यात्रेतून घरी आल्यावर त्याचा मोठा भाऊ शेषराव नागोराव सलामे वय ३५ याने सांगितले की , तू स्वयंपाक करून ठेव मी शेतातून तुरीचे पीक असल्याने जंगली वन्यप्राणी नासधूस करतात म्हणून रखवाली करण्यासाठी तुरखेड फाट्यानजीक असलेल्या शेतात गेला होता .
२६ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजताच्या दरम्यान मूर्तिजापूर- कारंजा मार्गाने जात असताना उमरी अरब येथील नितीन खंडारे यांनी सूचना दिली की, तुझा भाऊ हा अज्ञात वाहनाच्या धडकेने ठार झाला आहे . ही माहिती मिळताच मी घटनास्थळी जावून पाहले असता मोठा भाऊ झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडून दिसल्यावरून या प्रकरणाची फिर्याद दिल्यावरून अज्ञात वाहन चालकाने आपले वाहन निष्काळजी व भरधाव वेगात चालवल्याने ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .