महामानवाला विनम्र अभिवादन CRMS दादर येथे भीमसागर उसळला

 


               महामानवाला CRMS कडून अभिवादन  


मुंबई,दादर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन एनएफआयआरचे सहायक सरचिटणीस डॉ. प्रवीण बाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.


देशातील सर्व महापुरुषांचे वेळोवेळी स्मरण करण्यात आणि त्यांचे आशिर्वाद घेण्यात मध्य रेल्वे मजदूर संघ अग्रेसर आहे.

   तसेच आज देशाचे संविधानाचे जनक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील मुख्यालय संघ सदनच्या प्रांगणात सीआरएमएस तर्फे आयोजित कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष डॉ.प्रवीण बाजपेयी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रेल्वे परिवार करेल हा आमचा संकल्प आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक समस्या सोडवून मदत करण्याचा संघटनेचा संकल्प आहे.

  यावेळी संघाचे अध्यक्ष व दादर शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

त्यानंतर या महापरिनिर्वाण दिनी येणाऱ्या सर्व बांधवांना CRMS तर्फे वडापावचे वाटप करण्यात आले.

  याप्रसंगी सीआरएमएसचे अध्यक्ष डॉ. प्रवीण बाजपेयी, कार्याध्यक्ष व्ही.के.सावंत व अनिल महेंद्रू, मुंबई विभागाचे अधिकारी, दादर शाखेचे अध्यक्ष सचिव आणि रेल्वेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post