विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे अभिवादन


विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे अभिवादन

 


गावाकडची बातमी/गाव सहेली टीम 


चंद्रपूर,वरोरा :  भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे येतात. समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भीमराव रामजी आंबेडकर यांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनुयायी तसेच सर्व समाजातील नागरिक विनम्र अभिवादन करण्याकरिता 

दरवर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे रुग्णालय प्रांगणात असलेल्या डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला हार घालून मेणबत्ती लावून त्यांना अभिवादन केले. 

 उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    या कार्यक्रमाला डॉ.प्रफ्फूल खूजे वैद्यकीय अधीक्षक,डॉ. प्रविण केशवानी दंत चिकित्सक, वंदना विनोद बरडे अधिसेवीका, डॉ.आकाश चिवंडे वैद्यकीय अधिकारी,गितांजली ढोक आहारतज्ञ, संगीता नकले पसे.व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सर्वांनी श्रद्धांजली वाहून अभिवादन केले.





Post a Comment

Previous Post Next Post