४६ रक्तदात्यांनी केले रक्तदान ; १५० च्यावर रुग्णांनी घेतला मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ
मूर्तिजापूर - भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोफत भव्य आरोग्य तपासणी व रक्तादान शिबीराचे आयोजन करून अभिवादन करण्यात आले.
सदर शिबीर डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती,भारतीय बौद्ध महासभा,वंचित बहुजन आघाडी व समता सैनिक दल शाखा मूर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. यामध्ये शहरासह तालुक्यातील ४६ रक्तदात्यांनी रक्तदान केले व १५० च्या वर रुग्णांच्या आरोग्याच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत शिबीरात डॉ. आशिष वि. चक्रनारायण , एमबीबीएस एम डी(मेडिसीन) कन्सल्टिंग फिजीशियन,डॉ. हरिष वा. पातोंड एमबीबीएस, एमएस कन्सल्टिंग लॅप्रोस्कोपीक, जनरल सर्जन ,डॉ. एस.एन पाटील जनरल फिजीशियन,सर्जन या तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांच्या आरोग्याच्या वेगवेगळ्या तपासण्या करत आजाराचे निदान करून औषधोपचारासाठी सल्ला देत आपली निःशुल्क सेवा दिली व रक्तदान शिबिरातील रक्त संकलनासाठी डॉ प्रविण र. पालीवाल यांच्या श्री गजानन क्लिनीकल लेबॉरेटरी सह श्रीमती सुशीला देवी शर्मा हॉस्पिटल रक्त व रक्त घटक साठवणूक केंद्र यांच्या चमुचे सहकार्य लाभले.
या शिबीरांच्या यशस्वीतेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती,भारतीय बौद्ध महासभा,वंचित बहुजन आघाडी व समता सैनिक दल शाखा मूर्तिजापूर च्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.