शिराळा येथे श्री श्री १००८ सद्गुरु दादाजी धुनिवाले पुण्यतिथी महोत्सव व भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाला सुरुवात...!

 



शिराळा : स्थानिक शिराळा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सद्गुरु श्री श्री 1008 दादाजी धुनिवाले पुण्यतिथी व भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह महोत्सवाला सुरुवात झाली आहे. शुक्रवार दिनांक 6 -12 -2024 ते शुक्रवार दिनांक 13- 12 -2024 पर्यंत हा महोत्सव असून शिराळा तसेच परिसरातील आजूबाजूच्या गावातील मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची गर्दी पाहण्यास मिळते. यामध्ये श्रींचा महारुद्राभिषेक श्री नरेंद्र श्री कृष्णजी शर्मा व सौ सेजल ताई नरेंद्र राव शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला. व नर्मदा मातेचा अभिषेक रामकृष्ण नामदेवराव खैरकर (अमरावती ) व सौ कल्पनाताई रामकृष्ण खैरकर यांच्या हस्ते करण्यात आला.

     तीर्थ स्थापना सागर हरिदास राव लव्हाळे व शुभांगी सागर लव्हाळे यांनी केली व भागवत कथा तीर्थ स्थापना  गजानन रामदासजी ठाकरे महाराज शिराळा व छायाताई गजाननराव ठाकरे यांनी पार पाडले. शुक्रवार दिनांक 6- 12- 24 पासून दररोज सकाळी 9 ते 12 व दुपारी 3 ते 6 या वेळेत भागवत कथेचे आयोजन राहील.व दिनांक 12- 12- 24 गुरुवारला सायंकाळी 6 वाजता या भागवत कथेची समाप्ती राहील व शुक्रवार दिनांक 13.12. 24 रोजी गोपाल काल्याचे किर्तन ह. भ. प.श्री अनिरुद्ध साखरे महाराज विदर्भ माऊली श्री संत वासुदेव महाराज यांचे शिष्य यांच्या सुमधुर वाणीतून पार पडेल तसेच एक ते पाच या कालावधीमध्ये श्रींची पालखी व शोभायात्रा गावामधून निघेल. व सायंकाळी साडेसहाला दहीहंडी व महाप्रसादाच्या कार्यक्रम पार पडेल या कार्यक्रम प्रसंगी सप्ताह भर दररोज सकाळी साडेपाच वाजता श्रींची आरती सकाळी 9 ते 12 भागवत कथा दुपारी 1 ते 2:30 महिला भजन 3 ते 6 भागवत कथा सायंकाळी 7:00 वाजता श्रींची संध्या कालीन आरती 8 ते 9 दैनिक हरिपाठ व रात्री 9 ते 12 भजन संस्था याप्रकारे कार्यक्रमाचे नियोजन राहील.

 दिनांक 13. 12.24 रोजी महाप्रसादाच्या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून मनोज नि.देशमुख,अध्यक्ष, ऍडवोकेट यशोमती ताई ठाकूर,आमदार( माझी कॅबिनेट मंत्री )  बळवंतराव वानखडे ( खासदार अमरावती जिल्हा ) हरीश मोरे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती, भैय्यासाहेब निर्मळ उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती,  प्रीती बंड अमरावती, अलकाताई शि. देशमुख, संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती, जयेश बोडके अमरावती,  शरद देशमुख अमरावती, नानाभाऊ देशमुख, नितीन कोल्हटकर, युवराज चौधरी सचिव, विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटी अमरावती, डॉक्टर रवींद्र वाघमारे, राजेंद्र अग्रवाल जी,  घनश्यामजी अग्रवाल,  सिद्धार्थ दुबेजी, सुजित हरदास गुरुजी परतवाडा,  बबनराव देशमुख सुरळी, ओम प्रकाश रविशंकरजी टंडन, चांदूरबाजार, श्री हरी हर महाराज, निंभोरा, निरंदास महाराज, खडका जामगाव यांची प्रमुख उपस्थिती राहील.

Post a Comment

Previous Post Next Post