तहसीलदार किशोर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली महाकाल उर्फ नायब तहसीलदार कैलास जेठे यांची अर्ध्या रात्री धडक कारवाई
श्रीक्षेत्र माहूर नांदेड जिल्हा विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कवली तसेच तहसीलदार किशोर यादव यांचे मार्गदर्शनाखाली महाकाल उर्फ नायब तहसीलदार कैलास जेठे यांची वाळू तस्करा विरोधात धडक मोहीम सुरच असून त्यांनी दि 10 रोजी अर्ध्या रात्री मौजे बोंडगव्हाण तसेच पडसा येथून वाळू चोरी करणारे दोन ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा केल्याची घटना घडली असून वाळू तस्कर महाकालच्या धसक्याने अंधार रात्रीचा फायदा घेत वाहनांचे लाईट बंद करून वाळू चोरी करत असल्याने महाकाल उर्फ नायब तहसीलदार कैलास जेठे हे विविध प्रकारचे वेषांतर करून या कारवाया करत असल्याने वाळूतस्करांची तब्बल 32 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत.
नायब तहसीलदार- कैलास जेठे
वाळू तस्करांची याआधी 30 वाहने जप्त करून तहसीलदार किशोर यादव नायब तहसीलदार कैलास जेठे नायब तहसीलदार डॉ राजकुमार राठोड यांनी जरब निर्माण केला असून अर्ध्या रात्री छुप्या पद्धतीने तसेच लाईट बंद करून विना नंबरच्या वाहनाद्वारे चोरी वाळू चोरी करणारी वाहने पकडल्याने वाळू तस्करात जबरदस्त दहशत निर्माण झाली असून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तहसीलदारांना अग्नीशास्त्र दिल्यास वेळ प्रसंगी त्यांनी वाळू तस्करांना गोळ्या घालण्यासही मागे पुढे पाहणार नसल्याचा इशारा त्यांनी याआधीच दिला असून तरीही काही तस्कर नदीपात्रातून विना नंबरच्या वाहनांचे लाईट बंद करून वाळू चोरी करत असल्याची माहिती मिळाल्याने महाकाल उर्फ नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी वेशांतर करून मौजे बोंडगव्हाण आणि पडसा येथून चोरीची वाळू घेऊन जाणारी वाहने पकडल्याने वाळू तस्करांनी आपापली वाहने बिळात लपवून ठेवल्याचे चर्चा सुरू झाली आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी वाळू तस्करी करणाऱ्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची परवानगी देत वाळू तस्करावर तडीपारची कारवाही करावी अशी मागणी होत असून सहाय्यक जिल्हाधिकारी मेघनाकावली यांच्या आदेशानुसार तहसीलदार किशोर यादव यांनी तयार केलेल्या पथकात महाकाल उर्फ नायब तहसीलदार कैलास जेठे ,एस के साळसुंदर मंडळ अधिकारी, ओमप्रकाश तवर, ओंकार धनवे , प्रदीप कदम, सुमीत नैताम, अभिजीत कुडमते, साहेबराव गावंडे, तलाठी ग्राम महुसल अधिकारी तसेच महसूल सेवक दिपक लोखंडे व सागर हिवाळे यांचे सह कोतवाल आणि कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली.