कल्याण: जनमनाचा कनोसा घेणारा वृत्तपत्र लेखक पत्रकारितेतील एक अविभाज्य घटक आहे.पत्रलेखक राजकीय,शैक्षणिक,सांस्कृतिक,सामाजिक अशा विविध विषयांवर सडेतोडपणे आपल्या लेखन शैली द्वारे विचार व्यक्त करत असतो.आता बरेचसे वृत्तपत्र लेखक कवी,पत्रकार,संपादक आहेत. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.६जानेवारी या पत्रकार दिनाचे औचित्य साधून जनजागृती सेवा संस्थेच्यावतीने ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघातील पत्रकार,वृत्तपत्र लेखक,कवी यांचा छोटेखानी सत्कार समारंभ कल्याण येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आयोजित करण्यात आला होता.सर्व प्रथम प्रमुख पाहुणे अॅन्टीपायरसी सेल मुंबई चे तपाशी अधिकारी रामजित गुप्ता सर व समता साहित्य अकादमीचे महाराष्ट्र चे अध्यक्ष,राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त दिलीप नारकर सर यांचे संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी शाल,श्रीफळ,भेटवस्तू,गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी प्रास्ताविक केले.
त्यानंतर ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघातील पत्रकार,कवी,वृत्तपत्र लेखक प्रा.उदय सामंत,विवेक मालशे,दिवाकर गोळपकर,सुनिल इंगळे,नाना म्हात्रे,आर.एन.पिंजारी,सुधाकर कांबळी,सुनिल झळके,मनोहर गायकवाड,आनंदराव देसाई,बी.डी.गायकवाड,आशा पडवळ,सुरेखा गावंडे,अनिता कळसकर यांचा प्रमुख पाहुणे रामजीत महादेव गुप्ता व दिलीप नारकर यांच्या हस्ते शाल,नोटंगी डायरी,कुळकर्णी ब्रदर्सचे पाॅकेट कॅलेंडर,संस्थेचा अहवाल,गुलाब पुष्प,पेन बाॅक्स अशा स्वरुपात आकर्षक"सन्मानपत्र "प्रदान करुन यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी दिवाकर गोळपकर,प्रा.उदय सामंत,सुनिल झळके,अनिता कळसकर यांनी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डोंबिवली येथील मिठाईचे व्यापारी कुळकर्णी ब्रदर्स,सामाजिक कार्यकर्त्या कल्याण वाक्कर,सुनिल इंगळे,संस्थेचे खजिनदार दत्ता कडुलकर यांचे विशेष सहकार्य लाभले.शेवटी संस्थेच्या विनंतीला मान देऊन सर्व मान्यवर उपस्थित राहिल्याबद्दल अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी सर्वांचे आभार मानले.