🔹विधवा महिला भगिनी व उपासिका यांना वस्त्रदान व भाऊबीज भेट
🔹युवानेते व फुले शाहू आंबेडकर विचारसरणीचे पुरस्कर्ते मा.प्रकाश साबळे यांच्या पुढाकाराने सामाजिक उपक्रम
🔹सदर सोहळ्यास प्रसिद्ध रसायन शास्त्रज्ञ मा.श्रीमती.पवित्रा गडलिंगे (ऑस्ट्रेलिया) तसेच ग्रामगीताचार्य पौर्णिमाताई सवई,रिपाई नेते मा.चरणदास इंगोले,समाजसेवी मा.प्रशांत डहाने,कृषिसखी श्रीमती.सुनीता होळकर, मातृतुल्य श्रीमती.शांता खोब्रागडे, ज्ञानेश्वर काळे,अक्षय साबळे,मा.जीवन सरदार, माजी सरपंच देवराव छापाणी,उपसरपंच माधुरी सवाई,मा.देवराव भालेकर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
🔹 सदर अभिवादन कार्यक्रमास आशीर्वाद देण्यासाठी भन्ते राजरतन आवर्जून उपस्थित होते.
प्रमुख मान्यवर ,उपासिका यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सामूहिक अभिवादन केले. याप्रसंगी विविध गावांतील 45 विधवा महिला भगिनीस भाऊबीज भेट मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली..
🔹 महामानवांच्या अस्थी असलेल्या पवित्र अशा नया अकोला गावांत येऊन मी धन्य व उपकृत झाली-मा.पवित्रा गडलिंगे यांचे मनोगत
🔹 नया अकोला गावात संविधान निर्मात्याच्या अस्थी आहे आणि ते अस्थीस्थळ आम्हाला उर्जा व प्रेरणा देत राहील-प्रकाश साबळे
🔹 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची शिदोरी गावागावांत पोहचविण्यासाठी फुले,शाहू,आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुढे येण्याची गरज-ग्रामगीताचार्य सौ.पौर्णिमा सवाई
सूत्रसंचालन परवीन शहा व आभारप्रदर्शन श्वेता उलहे यांनी केले..
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छाया गजभिये,हरणेताई,इंदिरा सवाई, प्रीतम सवाई,नितीन भटकर यांनी प्रयत्न केले..