बेलोरा एअरपोर्ट समवेत अमरावती जिल्ह्यातील प्रलंबित विकास प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार

 



अमरावती जिल्हाच्या सर्वांगीण विकासासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सकारात्मक चर्चा 


जिल्ह्यातील आदिवासी, महिला, शेतकरी, शेतमजुर, युवक-युवती, दिव्यांग यांच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री जी पुर्ण ताकदीने सोबत असणार 


पवन पाटणकर प्रतिनिधी 

 जिल्ह्यांतील अतिशय महत्वाचे ग्रामीण आणि शहरातील प्रकल्प ,विकास कामाचे प्रस्ताव शासनाच्या कडे प्रस्तावित आहे. यावर मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली. विशेषतः बेलोरा एअरपोर्ट, पीम मित्रा मेगा टेक्सटाईल पार्क, अमरावती-परतवाडा-धारणी ते खंडवा राज्यमार्गला राष्ट्रीय महामार्गचा दर्जा देण्यात यावा, मोर्शी येथील हिवरखेड संत्रा प्रक्रिया केंद्र आणि चिखलदरा येथील स्कायवॉक समवेत इतर प्रलंबित विकास प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांना साकडे घातले. यावर विदर्भ सुपुत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक उत्तर दिले. लवकरच अमरावती (बेलारा) विमानतळावरून नियमित विमान वाहतूक सुरू होणार आहे. जेणेकरून अमरावती जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला देखील पंख लागणार आहे. लवकरच हे अतिमहत्वाचे प्रकल्प, प्रस्ताव आजच्या या बैठकीच्या माध्यमातून पुर्णत्वास जातील. तसेच जिल्हाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे निर्णय घेणार असल्याचे देखील मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी आवर्जून सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post