सिमेंट वाहतुक करणारा ट्रक पैनगंगेच्या पात्रात कोसळला

 


 मराठवाडा सिमेवर धनोडा गावाजवळ अपघात | ट्रक चालक गंभीर जखमी


 श्रीकांत राऊत,यवतमाळ 


 महागाव :-विदर्भ- मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीच्या पुलावरून एक ट्रक नदीपात्रात कोसळला, धनोडा आणि माहूर च्या दरम्यान पैनगंगेच्या पात्रात आज शनिवार दि. २८ डिसेबरच्या सायंकाळी पावणेसहा वाजताच्या सुमारास काळजाचा ठोका चुकविणारा हा अपघात

झाला. केटीसी कंपनीचा ट्रक (क्र.एमएच ३४ एबी ४०२३) माहूर मार्गे सिमेंट घेऊन यवतमाळ कडे निघाला होता. पैनगंगा नदीवरील अरुंद पुलावर येताच ट्रकचे समोरील चाके निखळल्यामुळे अनियंत्रित झालेला ट्रक माहूरच्या हद्दीत पुलावरून थेट नदीपात्रात कोसळल्याची

माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. अपघातानंतर झालेल्या मोठ्या आवाजामुळे स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकमध्ये अपघातग्रस्त चालकाव्यतीरिक्त अन्य कोणी नव्हते. या अपघातात चालक गंभीररित्या जखमी झाला. तो ट्रकच्या

केबीनमध्ये दबला होता. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रविण जयस्वाल आणि माहुर येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद भारती यांनी लगेच बाजुच्या बंधाऱ्यावरील जेसीबी आणून मदतकार्य सुरू केले. अथक प्रयत्नानंतर ट्रक

चालकास केबिन मधून बाहेर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. विदर्भ-मराठवाड्याला जोडणारा हा ऐतिहासिक पुल सातत्याने दुर्लक्षित आहे. काढण्यात यश आले. चालकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला उपचारासाठी माहूर येथील पुलाला अनेक महिन्यांपासून

संरक्षक कठडे नाहीत. पुलाला मागील अनेक महिन्यांपासून संरक्षक कठडे नाहीत. वृत्तपत्रांमधून अनेक वेळा बातमी प्रकाशित करूनही पुलाची डागडूजी केली जात नाही. आजच्या ट्रक अपघातात जखमी झालेल्या चालकाचे नाव कळू शकले नाही.

Post a Comment

Previous Post Next Post