बदलापूर- ग्रामीण भागातील चरगाव ग्रामपंचायत हद्दीतील कुरारपाडा येथील एका आदिवासी पाड्यावर,कल्याण स्वामी गौशाळा लव्हाळीच्या माध्यमातून तेथील गरीब व गरजु मुलांना व महिलांना जनजागृती सेवा संस्थेच्यावतीने खाऊ व कपडे वाटप करण्यात आले.सर्व प्रथम कुरारपाडा येथील श्रीराम मंदिरात जाऊन दर्शन घेऊन कार्यक्रमास सुरुवात केली.
यावेळी रामदास सेवाश्रम ट्रस्टचे अध्यक्ष परागबुवा रामदासी महाराज यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.येथील आदिवासी महिलांना व मुलांना समता साहित्य परिषदेचे अध्यक्ष,राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त दिलीप नारकर,सिटीझन वेलफेअर असोशिएशनचे सचिव राजेंद्र नरसाळे,वरिष्ठ सेवा निवृत्त पोलीस अधिकारी दिलीप शिरसाठ,ट्रस्टचे अध्यक्ष परागबुवा रामदासी महाराज,कल्याण स्वामी गौशाळेचे खजिनदार एकनाथ गायकर,जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर,सामाजिक कार्यकर्ते मितल राऊत,बुधाजी कुराडे यांच्या हस्ते खाऊ व कपडे वाटप करण्यात आले.यावेळी चरगाव ग्रामपंचायत येथे जाऊन तेथेही राम मंदिरात जाऊन दर्शन घेतले.तसेच लव्हाळी येथील कल्याण स्वामी गौशाळेलाही भेट दिली.शेवटी या उपक्रमाला संस्थेच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवरांना संस्थेच्या वतीने अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी आभार पत्र देऊन त्यांचे आभार मानले.