विशाल कडणे यांची राज्यमंत्री आ. माधुरी मिसाळ यांच्या निवासस्थानी अभिनंदनपर सदिच्छा भेट

 



पुणे (गुरुनाथ तिरपणकर) 

मुंबई गृहनिर्माण संस्थांचा महासंघ म्हणजेच मुंबई जिल्हा सह हाऊसिंग फेडरेशन ह्या मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महासंघाचे तज्ञ संचालक विशाल कडणे आणि सहकाऱ्यांनी आज महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्वाचित राज्यमंत्री आ. माधुरी मिसाळ यांची पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भेटी दरम्यान कडणे यांच्यासोबत गृहनिर्माण चळवळीतील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

    यावेळी मंत्री आ. माधुरी मिसाळ यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सिद्धेश कारेकर, राजेश सातघरे, शिरीष देवरुखकर, स्वप्नील चोणकर, चिन्मय पितळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे मंत्री माधुरी मिसाळ यांच्या निवासस्थानी स्वागत करण्यात आले. चहापानादरम्यान नगरविकास, सामाजिक न्याय विभागासंबंधी विविध विषयांवर चर्चा झाली.

Post a Comment

Previous Post Next Post