प्रतिनिधी : पवन पाटणकर
भारतीय दलित पॅंथर च्या वतीने 25 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावती येथे मनुस्मृती या विषमता व जातीयवादी विषारी ग्रंथाचे दहन करून मनुस्मृती दहन दिवस साजरा करण्यात आला. 25 डिसेंबर 1927 रोजी याच दिवशी प. पूज्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या जागतिक विद्वानाने महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाप्रसंगी सहस्त्रबुद्धे या ब्राह्मणाच्या हातून मनूस्मृतीचे दहन केले होते.
ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने पुस्तके ( ग्रंथ ) ठेवण्यासाठी भव्य अशी इमारत बांधली. राजगृहामध्ये भव्य असे ज्यांचे ग्रंथालय आहे. ज्यामध्ये 35 हजार ग्रंथ साठा संग्रहित केला आहे. असे पुस्तकावर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रज्ञावंताने मनुस्मृती नावाचा हिंदुत्ववादी ब्राह्मणी ग्रंथ जाळून होळी करावी ?
म्हणजेच हा ग्रंथ किती विषारी असावा..? हे लक्षात येते.
मनुस्मृती म्हणजे भारतीय लोकांचे सर्व मूलभूत अधिकार नाकारणारे ब्राह्मणी प्रवृत्तीने तयार केलेले भारताचे ते संविधान होते. या संविधानाच्या भरवशावर या देशात चातु:वर्ण व्यवस्था राबवून मुठभर ब्राह्मणांनी भारतातील सर्व लोकांना जाती पोट जातीत विभागून हजारो वर्षापासून गुलामीत ठेवले होते.
मनुस्मृतीने सर्वाधिक सर्वच जातींच्या महिलावर प्रचंड अत्याचार केला
इथल्या ब्राह्मण सोडून सर्व बहुजन समाजाचे सर्व मूलभूत अधिकार मनुस्मृतिद्वारे नाकारण्यात आले होते. इथल्या लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. चांगले अन्न खाण्याचा अधिकार नव्हता, घरात राहण्याचा, अन्यायावर दाद मागण्याचा कोणत्या प्रकारचा सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, न्यायिक अधिकार नव्हते, जाती जातीमध्ये उच्च निच्छता व अस्पृश्यता निर्माण करून मनुस्मृतीच्या द्वारे भारतीय समाजावर हजारो वर्षापासून अन्याय करून मुठभर लोकांनी देशाला गुलामीत ठेवून सत्ता उपभोगली आहे.
म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने विषमतावादी मनुस्मृती चे दहन करून भारतीयांना हजारो वर्षापासून त्या गुलामीतुन मुक्त केले.आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि लोकशाहीचे खरे भारतीय संविधान देशाला बहाल केले. देशाला व देशातील मानवाला खरे स्वातंत्र्य त्यांनी मिळवून दिले
मनुस्मृतीवादी प्रवृत्ती अजूनही देशात जिवंत असून डोकं वर काढत आहे. ते डोकं ठेचून काढण्यासाठी भारतीय लोकांनी संघटित होऊन जागृत व सावधान रहावे असे आवाहन भारतीय दलित पॅंथर ने याप्रसंगी केले आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाला पॅंथर प्रवीण पाटील जिल्हाध्यक्ष अमरावती, ज्येष्ठ पॅंथर नेते गौतम कांबळे मुंबई, गंभीर साहेब अमरावती, वसंत शेंडे अमरावती, मनोज धुळेकर उपजिल्हा प्रमुख अम,राजूभाऊ शेंडे, शिवदास गायकवाड, रवी शेंडे, केशव गायकवाड, धर्मा भाऊ बागडे, प्रकाश डोंगरे, अरुण वासनिक, सचिन मेश्राम, नागेश पाटील, अंकित मेश्राम, नागेश मेटांगे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.