ग्रामसेवकांची हजेरी जीपीएस बायोमॅट्रीक पध्दतीने होणार...!
GavakadachiBatmi : ग्रामसेवक ग्रामविकासाचा केंद्रबिंदू समजला जातोः मात्र अनेक ग्रामसेवक हे त्यांच्या नेमणूक झालेल्या गावामध्ये राहत नाहीत. गावकऱ्यांना कामासाठी ग्रामसेवकाचा शोध घ्यावा लागतो. काही ग्रामसेवक तर दांडी मारण्यात तरबेज आहेत. अशांना मात्र आता चाप बसणार आहे. ग्रामसेवकांची हजेरी जीपीएस आणि बायोमॅटीक माध्यमातून प्रणालीच्या घेण्याबाबत शासनाच्या उपसचिव यांनी नुकताच एक आदेश काढून तो सर्व विभागीय आयुक्त, जि. प. चे मुख्य कार्यकारी यांना रवाना केला आहे.
महाराष्ट्र विधान मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत दिलेल्या आश्वसनाच्या अनुषंगाने ग्रामसेवकाच्या नेटवर्क कनेक्टीव्हीटी उपलब्ध आहे. त्यामुळे ज्या ग्रामपंचायती या शहरी भागालगत आहेत. हजेरीबाबत जिल्हापरिषदेमध्ये मुख्यालयाच्या काही ठिकाणी बायोमॅट्रीक हजेरीसारख्या अद्ययावत यंत्रणेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदविली जाते. ग्रामसेवकाच्या बाबतीत ज्या ग्रामपंचायती या शहरी भागाच्या जवळ आहेत.
अशा ग्रामपंचायतीमध्ये बायोमॅट्रीक हजेरी राबविण्यात येते. अतिदुर्गम डोंगराळ भागात नेटवर्क मिळत नसल्यामुळे बायोमॅट्रीक प्रणालीद्वारे हजेरी प्रक्रिया राबविण्यास समस्या येऊ शकतातः मात्र बहुतांश भागात किंवा ज्या-ज्याठिकाणी नेटवर्क उपलब्ध आहे, अशा ठिकाणच्या ग्रामपंचायतीमध्ये बायोमॅट्रीक हजेरी प्रक्रिया राबविणे शक्य आहे. त्यामुळे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांची बायोमॅट्रीक हजेरी प्रणाली राबविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश शासनाच्या उपसचिव यांनी दिले आहे.
त्यामुळे दांडी मारणाऱ्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची चांगलीच गोची होणार असल्याचे पहावयास मिळणार आहे..