मूर्तिजापूर - येथे जागतिक दिव्यांग दिन गट साधन केंद्र पंचायत समिती मूर्तिजापूर व स्माईल चाइल्ड चॅरिटी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय जागतिक दिव्यांग दिन व समता सप्ताह साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रम भारतीय ज्ञानपीठ सभागृहा मध्ये पार पडला या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव, हिमा जोशी सीनियर लिओलॉजिक्स अमरावती यांची मुख्य उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून रितसर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.दिलीप सरदार ,केंद्र प्रमुख,संतोष पाठक सचिव भारतीय ज्ञानपीठ महाविद्यालय,नीता इंगळे मुख्याध्यापिका भारतीय ज्ञानपीठ महाविद्यालय रूपाली केतन तिडके सामाजिक कार्यकर्त्या ,गरिमा खंडेवाल अध्यक्ष स्माईल चॅरिटी संस्था ,विलास वानखडे अध्यक्ष नेहरू युवा बहू . क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कोकणवाडी,चंदन अग्रवाल सामाजिक कार्यकर्ते,स्माईल चॅरिटीच्या गिरिमा खंडेलवाल जया वर्मा ,भूमी गगनानी, मयुरी सारडा ,ममता वर्मा ,धनश्री वर्मा ,प्रगती अग्रवाल ,गुंजन अग्रवाल इत्यादींची उपस्थित होती.
तालुक्यातील दिव्यांगाना स्माईल चॅरिटीच्या वतीने स्वेटर कपडे ब्लॅंकेट्स पाणी बॉटल्स शैक्षणिक उपयोगी साहित्याचे वाटप तथा सर्वांन करीता अल्पोहाराची सोय त्यांच्या वतीने करण्यात आली यावेळी आपल्या अध्यक्ष भाषणांमध्ये श्री अपार म्हणाले की दिवांग्याच्या उत्थानासाठी समाजाने गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे त्यांना त्यांचा हक्क मिळून देण्यासाठी प्रत्येक समाज घटकाने आपली जबाबदारी पार पाडण्याची आवश्यकता आहे असे मत व्यक्त केले तर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की दिव्यांग विद्यार्थी हा सामान्य विद्यार्थ्यां बरोबर शिकून सक्षम बनू शकतो त्याला गरज आहे फक्त अशा स्माईल चॅरिटी मधील घटकातील महत्वाच्या व्यक्तींची की ते दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनी करिता असे कार्य करणाऱ्यांची अश्या सामाजिक उपक्रमा करीता मोठ्या मनाने पुढे यावे असे भावनिक उदगार त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले यावेळी सर्व मान्यवरांनी पण आपले विचार व्यक्त केले . दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थ्यांनी नृत्य गीते वक्तृत्व असे विविध कलाविष्कार सादर करून उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुक करून शुभेच्छा ही दिल्या अशा विविध उपक्रमाची सांगता करत जागतिक दिव्यांग दिन सप्ताहाची सांगता करण्यात आली सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश बोदले माध्यमिक युनिट विशेष शिक्षक यांनी केलेया कार्यक्रमाला गटसाधन केंद्राचे चेतना मोटू ,निखिल दिंडोकार, लक्ष्मण बोंद्रे ,सचिन सुदामे ,प्रमोद वानखडे ,सचिन बनसोड, नितीन गुल्हाने ,रवी पाटील यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अनिता इंगळे विशेषातज्ञ यांनी केले .