मूर्तिजापूर - तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करी व गोवंशाचे मास विक्रीचा धंदा हा जोरात सुरू असल्याच्या गोपणीय माहिती वरून येथील ठाणेदार सुरज सुरोशे यांनी सापळा रचून गोवंश मास विक्री करताना रिजवान अहमद मोहम्मद इरफान याचे घरी धाड टाकून रंगेहात गोवंश विक्री करताना पकडले.
प्राप्त माहितीनुसार रिझवान अहमद मोहम्मद इरफान हा घरी गोवंश विकताना माना पोलिसांना गुप्त माहिती वरून त्याचे घरी छापा टाकून गोवंश विक्री करताना रंग हात पकडून त्याच्या कडून गोवंश मास व नगदी रोख रक्कम व साहित्य असा ३२९० रुपयांचा माल जप्त केला असून माना पोलिसांनी ३३३/२४ नुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल इंगळे करीत आहे.