महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील व कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा अकोला तर्फे जाहीर निवेदन...

 


प्रतिनिधी : पवन पाटणकर 

 महाराष्ट्र शासनाने बेरोजगार युवक व युवतींची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत प्रत्येक शासकीय विभागात नियुक्ती केली होती.

 व त्याचा कार्यकाळ सहा महिन्याकरीता निर्धारित केला होता. परंतु सध्या स्थितीत या प्रशिक्षणाचा बहुतांश युवक युवतींचा सहा महिन्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यांचा हा कार्यकाळ वाढविण्यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील व राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्याचबरोबर अकोट विधानसभा मतदारसंघाचे आ. प्रकाश भारसाकळे यांची नागपूर येथे भेट घेऊन सर्व शासकीय विभागामध्ये काम करणारे युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ वाढविणे व त्यांना कायमस्वरूपी करण्यात यावे तसेच विद्यावेतनामध्ये सुद्धा वाढ करून द्यावी या मागणी करता भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा तर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा असंख्य्यांक मोर्चा चे अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्ष शेरूद्दीन पंचगव्हाणकर व जिल्हा उपाध्यक्ष मोहित ठेकेदार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post