आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा भावाचा आरोप ; पतीसह सासू सासऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल...!

 





    

मूर्तिजापूर - तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुरुम येथे २८ वर्षीय महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी १९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली होती. मृतक महिलेच्या भावाने आरोप करत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुरुम येथील २८ वर्षीय सपना आशिष मालधुरे या महिलेने दिनांक १९ डिसेंबर रोजी गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली होती.यावर मृतक महिलेचा भाऊ अंकुश शंकरराव बोबडे वय ३० ,रा. बासलपुरा , ता. चांदुर रेल्वे, जिल्हा अमरावती यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद असल्याप्रमाणे लग्नानंतर वेळोवेळी मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देऊन नातेवाईकांना हुंड्याच्या पैशाची मागणी करत होते. यासाठी गळफास घेण्यासाठी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले यावरून माना पोलीसांनी पती आशिष मालपुरे,वय ३६ वर्ष, सासरे नारायण तुकाराम मालपुरे,वय ६८ वर्ष, सासू बेबीताई नारायण मालपुरे , वय ६३ वर्ष यांच्या विरुद्ध कलम ८५, १०८, ८०(२), ३(५) बिएनएस ४९८ अ, ३०६, ३०४ ब, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 

          अधिक तपास ठाणेदार सुरज सुरोशे यांच्या मार्गदर्शानात उपनिरीक्षक गणेश महाजन हे करित आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post