मूर्तिजापूर - शहरातील संत रविदास नगर मध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना गेल्या दोन तिन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याने कारणाने महिलांनी एकत्र येऊन नगरपालिकेत एल्गार पुकारला अन् सिओनां निवेदन सादर करत पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
दिलेल्या निवेदनात उल्लेख केल्याप्रमाणे सदरच्या नगरात बहुसंख्य नागरीक वास्तव्यात आहेत त्यापैकी पाच ते सहा नागरीकांच्या इथे नळ कनेक्शन आहेत आणि उर्वरीत नागरीक कोण आहेत ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून गेल्या काही महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे आणि नगरात येणारी पाईप लाईन दि बऱ्याच ठिकाणी लिकेज् असून त्यामधून दुषीत पाणि पुरवठा केला जात आहे यावर नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला तर जबाबदार कोण ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे व पाईप लाईन हि लोकसंखेच्या प्रमाणात लहान आकारांची आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या " हर घर नल " हि योजना कागदावरच असल्याचा आरोप करत नगरातील सर्वच महिलां एकत्र येऊन नगरपालीकेवर धडकल्या आणि आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सिओ यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदन सादर करतेवेळी अनिता देविकर,पुजा डिठोर, दुर्गा देविकर, रूपा सुर्यवंशी, उषा देविकर, लता डिठोर, रेखा देविकर, मिना शहाळे, लक्ष्मी सुर्यवंशी, मिना शर्मा, सुनिता सतारे यांच्यासह बहुसंख्य महिलांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या असून प्रामुख्याने उपस्थित होत्या.
-------------------------------------------
सदरच्या नगरमध्ये जाणाऱ्या पाईप लाईनचे लिकेज बंद करून पाणि पूरवठा सुरळीत करण्यात येणार असून " मागेल त्याला नळ कनेक्शन " या योजनेतून नळ कनेक्शन देण्यात येतील.
एस. एस. टाले
प्रशासक तथा मुख्याधिकारी
नगर परिषद, मूर्तिजापूर