मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांना फॕक्स द्वारे पाठविले मागणीचे निवेदन
मूर्तिजापूर - मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघाचे सलग चार वेळ प्रतिनिधीत्व करणारे व या मतदरसंघात विकास कामांचा प्रचंड उपसा करणारे आमदार हरीष पिंपळे यांना मंत्रीमंडळात सहभागी करण्याची मागणी रिपाई (आ) चे तालुकाध्यक्ष अजय प्रभे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फॕक्स द्वारे निवेदन पाठवून केली आहे.
निवडणुकी दरम्यान आमदार हरीष पिंपळे यांच्या प्रचाराची धुरा बळकटीने सांभाळणारे अजय प्रभे यांनी या निवेदनातून आमदार हरीष पिंपळे यांच्या या मतदारसंघातील विकासकामांचा हवाला दिला आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जात प्रवर्गासाठी राखीव झाल्यापासून सलग विजयश्री खेचून आणणारे आमदार हरीष पिंपळे यावेळी चौथ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी झाले असून त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. काही हितशत्रूंनी त्यांचा अप प्रचार करण्यात कुठलीही कसर सोडली नाही, मात्र कार्यकर्ते व मतदारांचा विश्वास त्यांना विधीमंडळात पाठविण्यासाठी पुरेसा ठरला, त्यामुळे त्यांच्या सर्व जमेच्या बाजू व पक्ष संघटनेसाठी केलेले काम विचरत घेऊन त्यांना राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान देऊन न्याय द्यावा, असे अजय प्रभे यांनी म्हटले आहे व लवकरच ते यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.