महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 




महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर 


         भारतीय घटनेचे शिल्पकार तथा महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम व त्यांच्या चरणी मानाचा मुजरा. 

          डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू या गावी झाला त्यांचे वडील हे सुभेदार होते. तर बाबासाहेबांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी गुरुवारला झाला. केवळ 65 वर्षे आयुष्य जगले असे हे आमचे व समस्त भारतीयांचे महानायक, महाभूषण, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, विश्वरत्न,व दिन दलितांचे कैवारीच नव्हे तर समस्त भारतीय मुलनिवासी यांचे आधारस्तंभ अशा नावाने ज्यांचा गौरव कितीही केला तरी कमीच आहे.जोपर्यंत या भूतलावर चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत त्यांची ते कीर्ती हे जगभर अमर राहणार ही काळ्या या दगडावरची रेष आहे.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शतकोटी प्रणाम. 

        डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत देशाला अशी व्यक्ती लाभली आहे की, त्यांच्या विचारामुळे तमाम उपेक्षित समाजाला नवी दिशा मिळाली त्यांनी दिलेल्या संविधानामुळे आज प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र मतदानाचा हक्क मिळाला आहे. डॉ. बाबासाहेबांनी केवळ दिन दलितांसाठीच कार्य केले नाही तर, प्रत्येक जातीत जन्माला आलेल्या माणसासाठी त्यांचे कार्य मोलाचे आहे. त्यांनी असे म्हटले होते की,, मी हिंदू म्हणून जन्मलो परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही,,अशी त्यांनी ठामपणे घोषणा केली आणि अखेर नागपूर या ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956 रोजी हजारो बौद्ध बांधवासहित दीक्षा घेऊन एक आदर्श घालून दिला. 

         डॉ.बाबासाहेब असे महान व्यक्तिमत्व होते की त्यांच्या कार्याची बरोबरी जगातील कोणताही माणूस करू शकणार नाही. कारण त्यांचे कार्य एवढे महान आहे की आभाळापेक्षा महान आणि पृथ्वीपेक्षा मोठे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही .डॉ. बाबासाहेबांनी असा धम्म निवडला की त्या महान धम्माचे उपासक बोधिसत्व, महामानवांचे महानायक, जगातील महान विद्वान, जगाला शांतीचा संदेश देणारे विश्वभूषण, तथा महाकारुनी तथागत गौतम बुद्ध होय.यांचाच बौद्ध धम्म डॉक्टर बाबासाहेबांनी स्वीकारला, म्हणून आजतागायत बाबासाहेबांची कीर्ती आजही अमर आहे. 

         डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व कार्य याबद्दल सर्वांनाच बरीच माहिती आहे.तसेच त्यांचे वारस त्यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार बऱ्याच प्रमाणात करत आहेत, परंतु डॉक्टर बाबासाहेबांचे कार्य व त्यांच्या वारसांच्या कार्यात जमीन आसमाचा फरक आहे .कारण म्हणावे तसेच संघटन अजूनही त्यांना करता आलेले नाही. त्यानी दिलेला मौलिक विचार डोक्यात घेण्याचे कोणी धाडस करत नाही .

        डॉ.बाबासाहेबांचे तुम्हा आम्हावर व सर्वच माणव जातीवर एवढे उपकार आहेत की त्यांच्या उपकाराच्या कार्याची परतफेड करणे कदापी शक्य होणार नाही पण काही ना काही तरी तुम्हा आम्हाला त्यांचे देणे आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही. भारतीय मूलनिवासी यांनी त्यांना एक आदर्श महापुरुष समजून त्यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करणे हे प्रत्येकाचे आध्य कर्तव्य आहे. भीम जयंती किंवा महापरिनिर्वाण दिनी त्यांना फुले वाहिल्याने त्यांच्या कार्याची परतफेड होणार नाही. डॉ. बाबासाहेबांनी कोण्या एका जातीसाठी काम केले नाही तर भारत देशातील 18 पगड जातीतील लोकांच्या भल्यासाठी रात्र दिवस मेहनत घेऊन भारतीय राज्यघटना त्यांनी तयार करून दिनांक 26 नोव्हेंबर 1950 रोजी भारत देशाला संविधान अर्पण केले तो दिवस म्हणजे संविधान दिवस होय. तो दिवस भारतभर साजरा होतो. 

         कोणताही महापुरुष एका समाजाचा नसतो.जो एका समाजाचा ठरतो तो महापुरुष होऊ शकत नाही.महापुरुषाला त्याच्या जन्मामुळे म्हणजे ज्या कुटुंबात जन्म घेतो त्या कुटुंबाची किंवा त्या जातीची महापुरुषाला मर्यादा घालता येत नाही. कारण महापुरुषांचे कार्य हे सर्व समाजासाठी समान आणि महान असते. महापुरुष कधीच जाती पातीचा भेदभाव करीत नाही.पण तो आज प्रत्येक महापुरुषांना जातीत वाटून घेऊन वेगवेगळी विभागणी केली जाते. जसे डॉ. बाबासाहेब यांना दलितांनी, छत्रपती शिवाजी महाराजांना मराठ्यांनी, महात्मा फुलेंना माळी समाजाने, अण्णाभाऊ साठेंना मातंग, आणि बिरसा मुंडांना आदिवासीने, गुरुनानकाला शिखाने, संत रविदासला चांभारांनी, संत सेवालाल महाराज यांना बंजारा समाजाने अशा अनेक महापुरुषाला ज्या त्या जातीत विभागले.पण सर्व महापुरुष एकाच विचारांचे खंदे समर्थक होते. 

          डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्ध धर्मावरील आयुष्यभराच्या अभ्यासाचे चिंतन म्हणजे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ 1957 साली तो ग्रंथ प्रथम इंग्रजीत छापला गेला लिहिताना त्यांनी घाई केली नाही हा ग्रंथ लिहिण्याची प्रक्रिया अनेक वर्ष त्यांच्या महापरिनिर्वानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू होती भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे करेक्शन बाबासाहेबांनी स्वतः तपासले होते. शेवटपर्यंत दुरुस्त्या सुचवून अखेर हा ग्रंथ पूर्ण केला व मराठीत भाषांतर करून प्रथम 1970 साली त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर छापला या ग्रंथाच्या रूपाने बाबासाहेबांनी दलित बांधव व इतर समाजाला सुद्धा अशा प्रकारे एक अनमोल अशी ही ग्रंथाची भेट देऊन प्रत्येकांनी तो ग्रंथ वाचावा व त्यातील विचारांचे पालन करावे असे डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितले.डॉ. बाबासाहेबांनी अनेक कार्यकर्त्याला ते हयातीत असताना त्यांनी मोलाचा असा संदेश सुद्धा दिलेला आहे की, जागृतीचा अग्नी तेवत ठेवा बाबासाहेब दुसरा संदेश देताना सांगतात की, विचारात परिवर्तन झाल्याशिवाय आचरणात येऊ शकणार नाही. कार्यकर्त्यांची सर्वात मोठे कार्य कोणते तर डॉ.बाबासाहेबांच्या विचारधारेचा प्रचार व प्रसार करणे. कोणताही विचार कोणत्याही संदर्भाशिवाय नसतो तर तुम्ही शून्याकडे पाहत असाल तर त्याची प्रतिक्रिया शून्यच होते. तुमच्या मन बुद्धीवर शून्याची प्रतिक्रिया शून्यच होईल. तर शून्य कशाचाही संदर्भ असू शकत नाही तर एखादा विचार तुमच्या मनात मेंदूत निर्माण होत असेल तर त्याला कारण असते ते कारण त्या प्रतिक्रियांचा संदर्भ असू शकते. 

          डॉ.बाबासाहेबांचे कार्य व त्यांची विचारधारा आणि त्यांनी दिलेला मोलाचा संदेश या शब्दांची व त्यांच्या विचाराची पेरणी करायची असेल तर सर्वच भारतीयांनी एक दिलाने जात पात न मानता प्रत्येक महापुरुषांचे कार्य प्रत्येक मानव जातीने अंगीकारणे हे काळाची गरज आहे .डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न हे याचाच एक भाग आहे. समता ,स्वातंत्र्य बंधुता व न्याय याप्रमाणे प्रत्येकाला समान हक्क मिळालाच पाहिजे असे बाबासाहेबांना वाटत होते. डॉ.बाबासाहेब यांचे हे कार्य करण्यासाठी एक सच्चा भीमसैनिक म्हणून, एक सच्चा धम्म सैनिक होऊन ,एक सच्चा कार्यकर्ता म्हणून, एक निडर बौद्ध अनुयायी म्हणून, या सर्वांनी बाबासाहेबांच्या कार्याची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन पेलण्याची गरज आहे . सर्व समाज बांधवांनी सुद्धा त्यात योगदान देण्यास मागेपुढे न पाहता समोर यावे. 

         डॉ. बाबासाहेब विश्वाचे भूषण, संविधानाचे भाग्यविधाते, दिन दलितांचे कैवारी ,महामानव महामेरू, कायद्याचे महान पंडित, महान विचारांचा महान अथांग सागर अशा कितीतरी उपमा दिल्या तरी त्यांची स्तुती करणे कमीच पडेल. असे हे सर्व भारत प्रिय बाबासाहेब एकमेव आहेत डॉक्टर बाबासाहेबांनी देखील सूर्यानी नतमस्तक व्हावे अशी एक भीम डरकाळी फोडली जो सूर्य आपल्याला आकाशात रोज तळपताना दिसतो त्या सूर्यालाच बाबासाहेब म्हणतात, की, सूर्या तू वरच्या आकाशातील तार्‍यांना प्रकाश देण्याचे काम कर आणि मी इथल्या भूतलावर राहणाऱ्या मानव जातीला प्रकाश देण्याचे काम करतो.अशा प्रकारे समस्त विश्वाला आपल्या लेखणीने मोहित करणारे व सूर्याप्रमाणे सर्वांना सर्वांच्या कल्याणासाठी आपल्या विचारांचा प्रकाश देणारे बॅरिस्टर होऊन प्रदेशातून येणारे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेबच हेच आदर्शाचे खरे मानकर ठरू शकतात.एक कवी म्हणतात उधरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे ,या प्रकारे त्यांनी समाजात जागृतीचे महान कार्य केले. 

         डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती प्रबोधनातून आणि अनेक माध्यमातुन जनतेसमोर येत असते.लेखक पुस्तकातून, व्याख्याता व्याखान्यातून, प्रबोधनकार प्रबोधनातून, गायक गायनातून देतो अशा अनेक विविध प्रकारे त्यांच्या विचारावर प्रकाश टाकण्याचे काम केले जाते.पण कोण कशाप्रकारे व किती प्रमाणात आचरणात आणतो याला अधिक महत्त्व असते. बाबासाहेबांनी म्हटले होते कि, भारत एक दिवस बुद्धमय होईल. डॉक्टर बाबासाहेब यांच्या म्हणण्याप्रमाणे घडले पण त्यासाठी आंबेडकरवादी जनतेला जीवाचे रान करावे लागते. बाबासाहेबांनीअनंत संकटाना सामोरे जावे लागले त्याप्रमाणे यातना सहन करून प्रत्यक्ष कृतीतून आचरण करून रात्र दिवस डोळ्यात तेल घालून रात्र दिवस एक करून,एक एक कार्यकर्ता बाबासाहेबांच्या विचाराचा पायीक झाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार होईल. 

         माझ्या बाबासाहेबांच्या भीमसैनिकांनो,बौद्ध अनुयायांनो, समस्त सैनिकांनो आणि इतर बांधवांनानो उठा जागे व्हा आणि भीम कार्याची मशाल हातात घ्या भीम विचारांची पेरणी करण्याची आज गरज या देशाला आहे हीच वेळ आहे मर्दानीपणा दाखवण्याची. एरवी नुसते माझा बाबासाहेब म्हणता, मोठमोठ्याने गरजना करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो.मग त्यांच्या विजयाची पताका पेलण्याची ताकद या देशाला दाखवा की हा भीमसैनिक मोडेल पण वाकणार नाही. डॉक्टर बाबासाहेबांचे विचार म्हणजे एक धगधगती व पेटती आग आहे, पेटता लाल भडक ज्वाला आहे. डॉक्टर बाबासाहेबांचे विचार म्हणजे अथांग समुद्र आहे, लाटा आहेत, तुफान आहे,वारा आहे. कडकडणाऱ्या विजांचा प्रहार आहे ,डॉक्टर बाबासाहेबांचा विचार म्हणजे आभाळाला डरकाळी फोडणारी भिम गर्जना आहे, बाबासाहेबांचे विचार म्हणजे मेलेल्यांना जिवंत करण्यासाठी दिलेली संविधानाची अनमोल भेट आहे.डॉक्टर बाबासाहेबांनी म्हटले होते शिक्षण हे वाघीनीचे दूध आहे आणि तो पिणारा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. तसेच शिका संघटित व्हा शिक्षित बना हा संदेश सुद्धा त्यांनी दिलेला आहे. 

         डॉक्टर बाबासाहेबांचे कार्य एवढे महान आहे की सात्ता समुद्राची शाई केली तरी लिहिताना कमी पडेल व

लीहित असताना लिहिणाराचे अख्खे आयुष्य संपेल परंतु डॉक्टर बाबासाहेब यांच्या कार्याची महानता संपणार नाही. मी लिहीत बसलो तर मला रात्रंदिवस वेळ कमीच पडेल. एवढी ताकद एवढी बुद्धिमत्ता व गुणवत्ता मला बाबासाहेबांनी दिली म्हणून मला एवढी लिहिण्याची बुद्धिमत्ता लाभली .शेवटी डॉक्टर बाबासाहेब यांना नतमस्तक होऊन माझे त्यांच्याविषयीचे लिखाण संपवतो व डॉक्टर बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम व कोटी कोटी जय भीम.


      *जयभीम म्हणजे काय* 


जयभीम म्हणजे जोहार नव्हे, अन्यायाचा प्रतिकार आहे.

      जयभीम म्हणजे लाचार नव्हे, न्यायाचा विचार आहे.

       जय भीम म्हणजे चमत्कार नव्हे, विज्ञानाचे सार आहे.

       जयभीम म्हणजे हत्यार नव्हे, मानव जातीचा उध्दार आहे.

       जयभीम म्हणजे तक्रार 

नव्हे, समतेची ललकार आहे.

       जयभीम म्हणजे वापर नव्हे, कृतीची हत्यार आहे.

        जयभीम म्हणजे महार नव्हे,बहुजनांचा आधार आहे.


       गजानन वानखेडे 

लेखक तथा सामाजिक कार्यकर्ता

      सिंदगी (मो.) तालुका किनवट जिल्हा नांदेड 

मो.9763139224

Post a Comment

Previous Post Next Post