सुजान नागरिकांनी आणले उजेडात ; महसुल विभाग ?
मूर्तिजापूर - नगरपरिषद हद्दीत चिंधी तलावाच्या सौंदर्यकरणासाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध असून काम जोमाने सुरू आहे. पण एका ठेकेदाराने दुसऱ्या ठेकेदाराला त्यातील मुरूम हा रोडवर टाकण्यासाठी विक्री केल्याची धक्कादायक बाब दिनांक २ डिसेंबरच्या रात्री स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे लक्षात आली.तेथील अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला रात्री ९ वाजता दिल्यानंतर महसूल विभागाचे कर्मचारी पोहचले रात्री १२.३० वाजता या कालावधीत २ पोकलेन, जेसीबी व ६ टिप्पर याच्या माध्यमातून अंदाजे २००० ब्रास चे अवैद्य उत्खनन करून देवरन रस्त्यावर अंदाजे एक किलोमीटर पर्यंतच्या रस्त्यावर या तलावातील मुरूम टाकण्यात आला. त्या मुरुमाची शासकीय किंमत लाखो रुपयांची असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाला लाखो रुपयांचा चुना लावल्याची खमंग चर्चा जनसामान्य नागरिकांमध्ये होत असल्याचे दिसत आहे. शासकीय नियमाप्रमाणे रात्रीचे उत्खनन करता येत नाही. पण हे उत्खनन कोणाच्या आदेशाने सुरू आहे असे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. या ठेकेदारावर कोणत्या गॉडफादरचा त्याच्या डोक्यावर हात आहे. पण या ठिकाणी वेगळंच घडत असल्याचं दिसून आलं.
नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार थांबवण्यात आला. महसूल विभागाचे मंडळ अधिकारी राजू जाधव व तलाठी राजेंद्र पुरी हे घटनास्थळी पोहचले प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी मंडळ अधिकारी यांना महसूल प्रशासन कारवाईसाठी कमकुवत पडत असल्याचे प्रश्न विचारले तर मंडल अधिकारी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही.उपस्थित नागरिकांना सकाळी दहा वाजेपर्यंत कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महसूल विभाग या अवैद्य खनिज उत्खनन करणाऱ्या ठेकेदारावर काय कारवाई करणार. त्या ठेकेदाराच्या टिप्पर व पोकलेन ह्या सुद्धा अजून पर्यंत जप्त करण्यात आल्या नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांनी सदर प्रकरणात कठोर कारवाई करण्यासाठी दिनांक ३ डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, नायब तहसीलदार रवींद्र राऊत, अकोला जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे लेखी तक्रार करून संबंधित ठेकेदारावर गुन्हा नोंद करून योग्य ती कारवाई करण्यासाठी निवेदन दिले. सदर निवेदन मोहम्मद रफी शिरा उद्दीन, फिरोज खान अजमत खान यांनी निवेदन सादर केले.
-----------------------------------------------
मी आणि नगर पालिकेचे सीओ यांनी सदर ठिकाणची संयुक्त मौका पाहणी करून सौंदर्यकरणासाठी व रोडसाठी वापरण्यात आलेल्या गौण खनिजाबाबत सा.बां. विभाग व न. प.चे अभियंता यांच्याकडून रॉयल्टी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत त्यावर दोषी आढळल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
शिल्पा बोबडे, तहसीलदार
मूर्तिजापूर