महाराष्ट्र राज्य लॉटरी बंदी विरोधात लॉटरी विक्रेत्यांचा संताप

 


महाराष्ट्र राज्य लॉटरी बंदी विरोधात लॉटरी विक्रेत्यांचा संताप

लॉटरी विक्रेत्यांची बेकारीची फौज करणार काय..?                    

   मुंबई :  (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)

एकीकडे कारखाने, उद्योगधंदे स्थलांतरित होत असतांनाच लॉटरी विक्रेत्यांना बेकार करून त्यांची नवी बेकारांची फौज करण्याचा विचार नव्या राज्य शासनाचा आहे काय! असा संताप विक्रेत्यांनी प्रगट केला आहे. विरोधी पक्षनेत्यां पासून ते पक्ष प्रमुखांपर्यंत विक्रेते आता पोहोचले असून लॉटरी बंदीच्या निर्णयाला कडाडून विरोध त्यांनी नुकताच केला. 

महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचे जे प्रशासकीय षडयंत्र सुरू आहे त्याला जोरदार विरोध करण्याच्या अपेक्षेने शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे मातोश्री निवासस्थानी लॉटरी विक्रेत्यांचे नेते श्री विलास सातार्डेकर यांच्या नेतृत्वाखाली विक्रेत्यांचे शिष्टमंडळ पोहोचले त्याने सरकारच्या कट कारस्थानाचा यावेळी पर्दाफाश केला आहे. 

महाराष्ट्र राज्य लॉटरी संघटनेने नुकतीच मातोश्री'वर उद्भवजी ठाकरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अजिंक्यतारा' निवासस्थानी भेट घेऊन महाराष्ट्र राज्य लॉटरी बंदीच्या एकूणच हालचालींची माहिती नेत्यांना दिली. शिवसेना नेते विनायक राऊत यांनी ही लॉटरीच्या सद्यस्थिती बद्दल एक निवेदन स्वीकारले. विरोधकांनी

 सरकारला जाब विचारून विक्रेत्यांची रोजीरोटी सुरक्षित ठेवावी! अशीही अपेक्षा सातार्डेकर यांनी यावेळी केली. 

१९९७/९८ या वर्षी राज्य शासनाने अशाच प्रकारे लॉटरीबंदीचा निर्णय तडकाफडकी घेतला होता तेव्हा हे प्रकरण न्यायालयापर्यत पोहोचले 

त्यावेळी हिंदु हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी या बंदीला कडकडून विरोध केला होता राज्य शासनाला मिळणार्‍या महसुलीपेक्षा विक्रेत्यां च्या रोजीरोटीचा प्रश्न हा अधिक महत्त्वाचा आहे. 

बेकार, अपंग, विधवा, अंध, वयोवृद्ध, अबला यांचा सहभाग विक्रेते म्हणुन असल्याने 'लॉटरी बंदीचा निर्णय घेतल्यास स्वतः रस्त्यावर उतरीन! असाही आक्रमक पावित्रा शिवसेना प्रमुखांनी घेतला होता. त्याची आठवण सातार्डेकर यांनी यावेळी नेत्यांना करून दिली. 

या संदर्भात अधिक चौकशी करून उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून लॉटरी विक्रेत्यांच्या भावना मांडता येतील, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले. लॉटरी विक्रेत्यांच्या शिष्टमंडळात 

संघटनेचे सरचिटणीस राजेश बोरकर, उपाध्यक्ष कमलेश विश्वकर्मा, भावेश पवार, अनिल सावंत, उषा कंटागले, दीपाली शर्मा, आशिष गुरव ईत्यादींचा समावेश होता.

Post a Comment

Previous Post Next Post