भूमिहीनांना शेतजमीन मिळण्यात यावी यासाठी सहाय्यक आयुक्तांना निवेदन

 



भूमिहीनांना शेतजमीन मिळण्यात यावी यासाठी सहाय्यक आयुक्तांना निवेदन देण्यात आले



नेरपिंगळाई स्थानिक प्रतिनिधी प्रविण पाचघरे


अमरावती,मोर्शी :  तालुक्यातील भूमिहीन अनुसूचित जातीचे लोकांना शेतजमीन कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत मिळण्यात यावी. गेल्या अनेक वर्षापासून भूमिहीन लोकांचे अर्ज संबंधित विभागाकडे धुळखात पडले असून अधिकारी वर्ग यांनी दुर्लक्ष केले आहे या तालुक्यांमध्ये अनुसूचित जातीचे भूमिहीन लोकांचे प्रमाण भरपूर आहे तरी अद्याप पर्यंत या लोकांना जमिनीचे वाटप करण्यात आले नाही शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अनुसूचित जातीचे लोकांना जमिनीचे वाटप करावे.अशी मागणी सहाय्यक आयुक्त जाधव यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. 

   शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अनुसूचित जातीचे लोकांना जमिनीचे वाटप करावे अशी मागणी राजेश मानकर, कृष्णा बिडकर, पुनम धुर्वे, मीरा शिरसाम यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post