४० वर्षीय व्यक्तीला क्षुल्लक कारणावरून मारहाण...!

 


   



मूर्तिजापूर - शहरात त्रिमूर्ती नगरातील सेंट आन्स हायस्कूल समोर गॅदरींग बघून घरी परत जाणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीला तीन ते चार अनोळखी युवकांनी क्षुल्लक कारणावरून लाथा , बुक्क्या व कमरेच्या पट्ट्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना २० डिसेंबर रोजी ८ वाजताच्या दरम्यान घडली असून शहर पोलीस स्टेशनला अज्ञात तीन ते चार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

  शहरातील चिखली गेट राजगृह नगरातील रहिवासी भीमराव वामन आटोटे वय ४० वर्ष हे त्यांची १२ वर्षाची मुलगी अनुष्का हिच्या सेंट आन्स हायस्कूलमध्ये गॅदरींगचा कार्यक्रम बघण्यासाठी गेले होते . कार्यक्रम झाल्यानंतर रात्री ८वाजता सोबत पत्नी सविता , भाचा साहील दिलीप तेलमोरे वय १९ रा उत्तमसरा ता भातकुली व अनुप प्रमोद इंगळे वय १६ रा पळसो बढे यांच्या समवेत घरी परत येत असताना तीन ते चार अज्ञात टवाळखोर मुलांनी वाद उपस्थित करून भाचा साहील याला मारहाण केली .एवढेच नव्हे तर गेट बाहेर २० ते २५ वर्ष वयोगटातील अज्ञात युवकांनी भीमराव आटोटे यांना लाथा ,बुक्क्यां व कमरेच्या पट्ट्याने छाती ,डोके तसेच पाठीवर बेदम मारहाण करून जखमी केले , या झटापटीत मोबाईल सुध्दा गहाळ झाला आहे . आरोपी हे मारहाण करीत घटनास्थळावरून पसार झाले . भीमराव आटोटे यांना उपचारासाठी मूर्तीजापूरच्या लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे .

भीमराव आटोटे यांची जबानी तसेच वैद्यकीय अहवालावरून शहर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ११८(१),११५(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अधिकचा तपास ठाणेदार अजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे .





Post a Comment

Previous Post Next Post