सेंट ऑन्स स्कुलच्या विद्यार्थ्यांनी केली भारतीय संस्कृतीची उजळणी...!

 



चिमुकल्यांनी जिंकली उपस्थितांची मने ; स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न





मूर्तिजापूर - विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने शाळेच्या वतीने दरवर्षी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येत असून विद्यार्थांनी आपल्यातील कला सादर करतांना भारतीय संस्कृतीचे जतन करून संगणक आणि मोबाईलच्या युगात विसर पडत चाललेल्या भारतीय संस्कृतीची उजळणी केली.




               कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या व कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, दिप प्रज्वलन व मान्यवरांच्या स्वागत करून स्वागत गीताने करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयात प्राविण्य प्राप्त केले त्याबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर संगणकाच्या युगात व मोबाईलच्या अति वापरामुळे नागरिकांमध्ये विसर पडत चाललेल्या भारतीय संस्कृतीची " आपली संस्कृती आपला वारसा " या शिर्षकाखाली पथनाट्य सादर करत उत्तमपणे इयत्ता १० वीच्या विद्यार्थांनी उजळणी करत अखंड भारताची साक्ष दिली. त्यानंतर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पंजाबी गीतावर नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली.



      या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी संजय मोरे, प्रमुख अतिथी म्हणून दिवाणी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए.जी.तांबोळी, न्यायाधीश आर.आर.पाकडे तर विशेष अतिथी म्हणून मोहन गावंडे ,सरपंच, सांगवामेळ,प्रगती पांडे ,सरपंच, कुरणखेड,विलास गवई ,सरपंच,सिरसो यांच्यासह मुख्याध्यापिका सुचिता ,व्यवस्थापक मर्लिन ,पंडित पुरोहित ऐ जे जोसेफ इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.



        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा मेहकरे यांनी आभार प्रदर्शन अंजली चरडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक ज्ञानेश ताले यांच्यासह इतर शिक्षक,शिक्षिका व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post