चिमुकल्या लक्ष्मी चा वाढदिवस मतीमंद व मुकबधीर विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य देऊन साजरा

 


चिमुकल्या लक्ष्मी चा वाढदिवस मतीमंद व मुकबधीर विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य देऊन साजरा





 मूर्तिजापूर - येथील पत्रकार तथा रिपाई (आठवले)चे तालुकाध्यक्ष अजय प्रभे यांनी त्यांची ७ वर्षीय मुलगी लक्ष्मी हिचा वाढदिवस येथील पुंडलिक नगरातील श्री संत गुणवंत निवासी मतीमंद विद्यालयातील मतीमंद व स्व.एम एस मुकबधीर विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य भेट देऊन व अल्पोपहार देऊन साजरा केला. 

      ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिपक जोशी यांच्या अध्यक्षतेखाली 

श्री संत गुणवंत निवासी मतीमंद विद्यालय व स्व.एम एस विद्यालयात आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार प्रा.अविनाश बेलाडकर, जेष्ठ पत्रकार संजय उमक, पत्रकार मिलींद जामनीक, पत्रकार प्रतिक कुऱ्हेकर,महिला मुक्ती फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सुदेश रजाने,प्रदेश अध्यक्षा लक्ष्मीताई गावंडे, राज्य उपाध्यक्ष राजकुमार वानखडे,राज्यसचिव गणेश वाकोडे,सुरेंद्र मोरे,कमलकिशोर भारतीय,सरिता देवी मनोहरे,लता धनकळ,मंगला दिंडोकार,सीमा निंबोकार,पुष्पा तीहिले,रजनी मातने, अनुरुती गुहे,कविता वानखडे. तुळशीरामजी गुंजकर महिला शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष कार्यकर्त्याची उपस्थिती होती. 


      प्रा.दीपक जोशी यांनी यावेळी बोलतांना लक्ष्मी ला वाढदिवसानिमीत्य शुभेच्छा व शुभाशीर्वाद देऊन आगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचा कौतुक करून क्रीडा साहित्य भेट मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर फुललेले हास्य अमूल्य असल्याचे प्रतिपादन केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब खांडेकर यांनी केले. अजय प्रभे यांनी आभार मानले.राजेन्द्र प्रभे,राजेश तेलगोटे,सुभाष प्रभे,प्रतिक प्रभे,पियुष प्रभे,दिपक कोकणे,रवि हिवराळे,सुरज वाघ, शक्ती प्रभे यांनी परीश्रम घेतले.



Post a Comment

Previous Post Next Post