गेल्या महिन्याभरातील नववी- दहावी घटना ; चोरट्यांचा शोध घेण्यास पोलिसांना अपयश...
मूर्तिजापूर - शहरात गेल्या महिन्याभरापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून मूर्तिजापूर शहरात ९ ते १० ठिकाणी घरफोड्या झाल्याची घटना घडल्या आहेत.मात्र पोलिसांना चोरट्यांचा शोध घेण्यात अध्यापही यश मिळाले नसतांनाच पुन्हा एकाच परिसरात एकाच रात्री दोन घरफोड्या झाल्याची घटना घडली आहे.
मूर्तिजापूर शहरातील स्टेशन विभाग परिसरातील गणेश नगर स्थित असलेल्या शांती नगर येथे शनिवार दि. २८ डिसेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत घराच्या कडी-कोंड्या तोडून एकाच रात्री एकाच परिसरात दोन घरफोड्या करून एकूण दोन्ही घरातील मुद्देमाल लंपास केला असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ६१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. विशेष म्हणजे चोरट्यांनी आजूबाजूच्या घरातील नागरिकांना आवाज येईल या भीतीपोटी चक्क परिसरातील इतर घरांना बाहेरून कडी लावून बंदिस्त करून ठेवल्याचे परिसरातील काही नागरिकांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
गणेशनगर स्थित असलेल्या स्टेशन विभाग परिसरातील शांती नगर येथे राहणाऱ्या राजेश भातखंडे हे व त्यांचे शेजारी दिनेश किसन बाहे घरगुती कामानिमित्त बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी घरावर पाळत ठेवत राजेश भातखंडे यांच्या घराचे कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करत कपाटातील २० हजार रुपये रोख रक्कम, ३ ग्राम सोन्याच्या दागिन्यांची नथ, एक ग्राम सोन्याच्या दागिन्याचे पोथ व चांदीचे विविध भांडे असा एकूण २३ हजार रुपयांचा ऐवज तर दिनेश किसन बाहे यांच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांचे अडीच ग्रामची अंगठी, ३ ग्रामची सोन्याच्या दागिन्यांचे कानातले व चांदीचे २० ग्रामचे विविध भांडे आणि १२ हजार रुपये रोख असा एकूण ३८ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांच्या नोंदी नुसार चोरांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
गेल्या महिन्याभरतील सदर घटना ही ९ ते १० वी असून अध्यापही पोलिसांना चोरीचा सुगावा लावण्यात यश मिळाले नसल्याने शहरात नागरिक सुरक्षित आहेत की नाही..? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षकांनी शहरात गेल्या महिन्यात भरात सुरू असलेल्या चोऱ्यांच्या सत्राचे गांभीर्याने घेऊन चोरट्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातून सर्व स्तरावरून करण्यात येत आहे.