छ.सं. नगर जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख
सोयगाव तालुक्यातील नांदा तांडा येथील एका २२ वर्षीय इसमाने चारु तांडा धरनात आत्महत्या केल्याची घटना काल १०, नोव्हेंबर रविवार रोजी दुपारी घडली. याप्रकरणी फरदापुर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. जितेंद्र मदन राठोड
असे मृतकाचे नाव असून ते नांदातांडा येथील रहिवासी आहे. जितेंद्र मदन राठोड हा दिनांक 09/11/2024 रोजी दुपारी 03:00 वाजता तो आमच्या मोटरसायकल क्रमांक MH 20FV 6517 ही घेऊन घरातून चारूतांडा येथे शेतात जाऊन येतो असे सांगून निघून गेला होता परंतु तो त्या दिवशी घरी परत न आल्याने आम्ही त्याचा शोध घेतला परंतु तो कोठेही मिळून आला नव्हता त्यामुळे मी दिनांक-10/11/2024 रोजी पोलीस ठाणे फर्दापूर येथे हरवल्या बाबत तक्रार दिली होती त्यावरून पोलीस ठाणे फर्दापूर येथे मिसिंग क्रमांक-14/2024 दाखल करण्यात आली होती त्यानंतर दिनांक- 10/11/2024 रोजी पोलीस आणि आम्ही चारूतांडा शिवार येथे त्याचा शोध घेत असताना तो घेऊन गेलेली मोटार सायकल MH20 FV 6517 ही व त्याच्या पायातील चप्पल हे चारूतांडा साठवण तलावाच्या कडेला दिसून आल्याने त्याने पाण्यामध्ये उडी मारून आत्महत्या केली असावी असा संशय आल्याने दिनांक- 11/11/2024 रोजी सकाळपासून पोलीस व अग्नीक्षम दलामार्फत चारूतांडा साठवण तलावात शोध कार्य चालू असताना त्याची डेड बॉडी 11:00 वाजता साठवण तलावात मिळून आली असून त्याची बॉडी सावळतबारा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवली असून वैद्यकीय अधिकारी यांनी डेड बॉडी तपासून त्याला मयत घोषित केले वगैरे प्रथमखबरी दाखल करून पुढील चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांच्या आदेशाने पोहेका- मिरखा तडवी पोलीस अमलदार शिवदास गोपाल यांच्याकडे देण्यात आला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण नांदा तांडा येथे एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
चारु तांडा येथील धरनात २२ वर्षीय इसमाची आत्महत्या!
byGavakadachi Batmi
-
0