महायुतीची सत्ता आली तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू..!
मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी मुलीचे मामा मंत्रालयात बसले आहेत...!
मूर्तिजापूर - महायुतीच्या सरकारने आतापर्यंत विविध योजना राबविल्या आहेत. शेतकरी असो, लाडकी बहीण योजना, विद्यार्थ्यांसाठी योजना असो याच धरतीवर पुढेही योजना राबविण्याचा मानस महायुतीचा आहे. पूर्वी घरात दोन मुले जन्माला आली तर मुलाला शिकवायचे व वडील म्हणायचे मुलीला शेवटी लग्न करून आपल्या घरीच जायचे आहे परंतु मुलींनो तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही तुमचा मामा मंत्रालयात बसला आहे, तुमच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च तुमचा देवेंद्र मामा करेल. जसे २५० कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर पर्यंतचे पैसे पडलेत तसेच विरोधकांची तोंडे बंद पडली. आम्ही सख्खे भाऊ आहोत निवडणुकीच्या तोंडावर बाजारात सावत्र भाऊ महाराष्ट्रभर फिरत आहेत. १५०० ऐवजी महायुतीची सरकार आल्यावर २१०० रुपये तुमच्या खात्यात पडतील असाही वादा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना केला आहे.
पुढे बोलताना मोदींच्या मार्गदर्शनात आपलं सरकार परिवर्तन करीत आहे. येत्या पाच वर्षात शेतकऱ्यांना वीज बिल येणार नाही, २४ तास शेतकऱ्यांना वीज मिळेल तर सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, १० टक्के रक्कम भरून मागेल त्या शेतकऱ्याला सौर ऊर्जा वीज पंप देऊ,देशातील सगळ्यात मोठा व पहिला नदी जोड प्रकल्प यामध्ये नळगंगा, पैनगंगा, वैनगंगा नद्यांचा समावेश असून या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भातील काही जिल्ह्यातील १० लाख एक्कर शेती सिंचनाखाली येणार असून विदर्भातील एकही तालुका पाण्या वाचून राहणार नाही आणि विदर्भातला दुष्काळ भुतकाळात टाकायचा आहे यासाठी ८८ हजार कोटी रुपये प्रस्तावित आहे. खऱ्या अर्थाने आम्ही मोठे स्वप्ने पाहतो. छोटी स्वप्ने पाहणारे आम्ही नाही नाव न घेता अशी कोपरखडी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला मारली. या मतदारसंघातील १०० कोटीचे कामे पूर्ण करण्याची मी ग्वाही देतो असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघ भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हरीश पिंपळे यांच्या प्रचारार्थ मूर्तिजापूर येथे जाहीर सभेत बोलतांना दिली.
या जाहीर सभेला भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, मध्यप्रदेशचे क्रीडामंत्री विश्वास सारंग, खासदार अनुप धोत्रे, गोपीकिशन बाजोरिया, वसंत खंडेलवाल व उमेदवार हरीष पिंपळे व्यासपीठावर उपस्थित होते. सभेपूर्वी सर्व मान्यवरांनी महापुरुषांसह भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून सभेची सुरुवात करण्यात आली.